SEE PICS : अजय देवगणसोबत झळकलेली ‘ही’ चिमुकली आता बनलीय हिरोईन!  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 08:00 AM2019-07-07T08:00:00+5:302019-07-07T08:00:04+5:30

नुकताच ऋषी कपूर यांच्या ‘झूठा कहीं का’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या मल्टीस्टारर चित्रपटातील एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. होय, हा चेहरा कुणाचा तर रूचाचा.

rucha vaidya will now star in rishi kapoor new comedy film Jhootha Kahin Ka | SEE PICS : अजय देवगणसोबत झळकलेली ‘ही’ चिमुकली आता बनलीय हिरोईन!  

SEE PICS : अजय देवगणसोबत झळकलेली ‘ही’ चिमुकली आता बनलीय हिरोईन!  

googlenewsNext
ठळक मुद्देआशुतोष गोवारीकर यांच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटातही ती दिसली होती. यात तिने जोधाच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

नुकताच ऋषी कपूर यांच्या ‘झूठा कहीं का’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या मल्टीस्टारर चित्रपटातील एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. होय, हा चेहरा कुणाचा तर रूचा वैद्या हिचा. बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली रूचा आता मोठी झालीय आणि हिरोईन म्हणून पडद्यावर दिसणार आहे.
या रूचाने अमिताभ बच्चन, अजय देवगण, हृतिक रोशन अशा अनेकांसोबत काम केले आहे. २००५ मध्ये प्रदर्शित ‘एक अजनबी’ या चित्रपटात रूचा दिसली होती. यात अमिताभ बच्चन आणि अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत होते.

यानंतर अजय देवगण स्टारर ‘मैं ऐसा ही हूं’ या चित्रपटाही रूचा बालकलाकार दिसली होती. तिच्या अदाकारीने सर्वांचीच मने जिंकली होती. यापश्चात आशुतोष गोवारीकर यांच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटातही ती दिसली होती. यात तिने जोधाच्या बालपणीची भूमिका साकारली होती. २००८ मध्ये प्रदर्शित या चित्रपटात हृतिक रोशन, ऐश्वर्या राय लीड रोलमध्ये होते. हीच रूचा आता ‘झूठा कहीं का’ या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

रूचा इन्स्टाग्रामवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर स्वत:चे रोज नवे फोटो ती पोस्ट करत असते. चित्रपटांशिवाय अनेक जाहिरांतीतही ती झळकली आहे.




ऋषी कपूर यांनी ‘झूठा कहीं का’चे शूटींग गतवर्षी आॅगस्टमध्ये पूर्ण केले होते. यानंतर सप्टेंबरमध्ये आपल्या आजारावरील उपचारासाठी ते अमेरिकेला रवाना झाले होते. ‘झूठा कहीं का’हा चित्रपट येत्या १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
पाहुयात ग्लॅमरस रूचाचे आणखी काही फोटो...

Web Title: rucha vaidya will now star in rishi kapoor new comedy film Jhootha Kahin Ka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.