Rohit Shetty flopped and so did Shah Rukh Khan - Kajol's 'Dilwale'! Read, An Interesting Hidden Story | ​रोहित शेट्टी बहकला अन् म्हणून फ्लॉप झाला शाहरूख खान - काजोलचा ‘दिलवाले’ ! वाचा, एक इंटरेस्टिंग Hidden Story

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘गोलमान अगेन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. पण रोहितचा या आधीचा चित्रपट अर्थात ‘दिलवाले’ अद्याप लोक विसरू शकलेले नाहीत. हा चित्रपट रोहितच्या करिअरमधील सर्वांत मोठा फ्लॉप होता, कदाचित म्हणून हा चित्रपट लोकांच्या स्मरणात आहे. शाहरूख खान व काजोलची हिट जोडी, वरूण धवन व क्रिती सॅनन यांचा रोमॉन्स सगळे असूनही हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. खरे तर रोहितच्या चित्रपटात असतो तो सगळा मसाला यात होता. म्हणजेच, जबरदस्त स्टारकास्ट, तेवढीच जबदस्त अ‍ॅक्शन असे सगळे. पण तरिही चित्रपट आपटला. आता इतक्या दिवसानंतर हा चित्रपट आपटण्यामागचे कारण समोर आले आहे.  रोहित शेट्टीने या चित्रपटाबद्दल  एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, ‘हम स्क्रिप्ट से बहक गए थे,’ असे रोहितने म्हटले आहे. आता रोहितच्या या वाक्यावरून नेमके प्रकरण तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे तुम्ही सविस्तर वाचायला हवे.रोहितचे मानाल तर,‘दिलवाले’ फ्लॉप झाला, त्यामागे त्याची स्क्रिप्ट कारणीभूत होती. या चित्रपटाची ओरिजनल स्क्रिप्ट वेगळीच होती. पण ऐनवेळी रोहितने त्यात बदल केले अन् सगळेच फिस्कटले.रोहितने सांगितले की, ‘दिलवाले’ची ओरिजनल स्क्रिप्ट ही तीन भावांची कथा होती. ही ओरिजनल स्क्रिप्ट कॅरी केली असती तर त्यात कालोज फ्लॅशबॅकमध्ये केवळ तीन चार सीन्समध्ये दिसली असती. पण या चित्रपटातून काजोल व शाहरूख या जोडीचे कमबॅक होणार होते. लोक त्यामुळे एक्ससाईटेड दिसले. याच एक्ससाईटमेंटमध्ये मी सुद्धा ओरिजनल स्क्रिप्ट बाद करून काजोल व शाहरूखच्या रोमान्सवर फोकस करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या हातून एक मोठ्ठी चूक झाली. चित्रपट दणकून आपटला. मी पहिल्यांदाच ओरिजनल स्क्रिप्ट बदलली होती. पण यातून मी एक मोठ्ठा धडा शिकलो. यापुढे कधीही ओरिजनल स्क्रिप्टशी छेडछाड करणार नाही, हे मी ठरवून टाकले.

ALSO READ : रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग या महिन्यात सुरु करणार चित्रपटाचे शूटिंग

‘दिलवाले’ची ही ओरिजनल स्क्रिप्ट अजूनही माझ्या डोक्यात आहे. कदाचित  १५ वर्षांनंतर मी यावर चित्रपट काढेल. कारण आत्ताच मी तो आणला तर सोशल मीडियावर हा चित्रपट एक मोठा विनोद बनून राहिल. ‘दिलवाले’ची ओरिजनल स्क्रिप्ट अगदी ‘रोहित शेट्टी स्टाईल’ आहे, असेही त्याने सांगितले.
Web Title: Rohit Shetty flopped and so did Shah Rukh Khan - Kajol's 'Dilwale'! Read, An Interesting Hidden Story
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.