रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतचं ‘चोरी चोरी चुपके चुपके’ अफेअर ?, नवीन फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 11:37 AM2019-07-16T11:37:12+5:302019-07-16T11:40:31+5:30

प्रत्येक फोटोवर नजर टाकली असता सुशांत सिंह रिया चक्रवर्तीसह मस्त क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना पाहायला मिळतोय.

Riya Chakraborty and Sushant Singh Rajput's 'Chori Chori Chupke Chupke' affair? | रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतचं ‘चोरी चोरी चुपके चुपके’ अफेअर ?, नवीन फोटो आले समोर

रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतचं ‘चोरी चोरी चुपके चुपके’ अफेअर ?, नवीन फोटो आले समोर

googlenewsNext

सुशांत सिंह राजपूत विषयी रसिकांचं प्रेम इतकं आहे की, त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे याबाबत जाणून घेण्यास ते उत्सुक असतात. मग ते त्याचं अफेअर असो, त्याच्या अपकमिंग सिनेमाविषयी असो प्रत्येक विषयात सुशांतच्या फॅन्सना रस असतो. अशा अनेक रसिकोत्सुक गोष्टींपैकी एक बाब म्हणजे सोशल मीडियावर त्याचे रिया चक्रवर्तीसह व्हायरल होणारे फोटो. प्रत्येक फोटोवर नजर टाकली असता सुशांत सिंह रिया चक्रवर्तीसह मस्त क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना पाहायला मिळतोय. या फोटोंमध्ये या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे समजतंय. त्यामुळे सुशांत आणि रिया यांच्या प्रेमाचे नाते फुलत असल्याचे चर्चाही सुरू झाल्यात.


काही दिवसांपूर्वी रियाचा बर्थ डे हटके सेलिब्रेट करण्यासाठी दोघे काश्मीरमध्ये गेले होते.या वेळी सुशांतने तिला एक खास सरप्राईज गिफ्टही दिले होते. एक सुंदर असे  पेंडेंट तिला यावेळी सुशांतकडून गिफ्ट म्हणून भेट दिले होते. सूत्रांनी सांगितले, रिया आणि सुशांत यांचे नाव काही काळापासून एकमेकांशी जोडले जात आहे. दोघे एकमेकांबरोबर आनंदी दिसत आहेत. त्यामुळे दोघांनी या विषयी उघडपणे बोलणे टाळले आहे. . त्यांच्यात मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त असल्याची चर्चा असली ते दोघे एकमेकांचे केवळ खूप चांगले मित्र असल्याचे कबूल करतात. रिया आणि सुशांत एकमेकांचे केवळ फ्रेंड्स आहेत की दाल में कुछ काला है याविषयी केवळ ते दोघेच सांगू शकतात. 

सुशांत 'पवित्र रिश्ता' या मालिकेत काम करत असताना त्याची ओळख अंकिता लोखंडे सोबत झाली होती. ते दोघे अनेक वर्षं नात्यात होते. पण त्यांनी काही वर्षांपूर्वी ब्रेकअप केले. रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.

 

 'दोबारा' ,  'हाफ गर्लफ्रेन्ड', ' बँक चोर'  अशा अनेक सिनेमात ती झळकली आहे. यावर्षी सुशांतचा ‘छिछोरे’ आणि ‘दिल बेचारा’ रिलीज होणार आहे. दुसरीकडे रियाने ‘चेहरे’चे शूटिंग पूर्ण केले आहे.

Web Title: Riya Chakraborty and Sushant Singh Rajput's 'Chori Chori Chupke Chupke' affair?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.