रितेश देशमुखने शेअर केलेत धक्कादायक व्हिडीओ, हैदराबाद एअरपोर्ट सिक्युरिटीची अशी घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 11:53 AM2019-05-28T11:53:38+5:302019-05-28T11:58:03+5:30

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असतो. अलीकडे रितेशने हैदराबाद विमानतळावरचे दोन व्हिडीओ शेअर केलेत. हैदराबाद विमानतळावरील निष्काळजीपणाचे चित्र दाखवणारे हे दोन्ही व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहेत.

riteish deshmukh shared hyderabad airport lounge video to address the issue of lock exit door | रितेश देशमुखने शेअर केलेत धक्कादायक व्हिडीओ, हैदराबाद एअरपोर्ट सिक्युरिटीची अशी घेतली शाळा

रितेश देशमुखने शेअर केलेत धक्कादायक व्हिडीओ, हैदराबाद एअरपोर्ट सिक्युरिटीची अशी घेतली शाळा

googlenewsNext
ठळक मुद्देरितेशच्या या ट्वीटनंतर हैदराबाद विमानतळ प्रशासनाने उत्तर देत, प्रवाशांना झालेल्या असुविधेबद्दल खंत व्यक्त केली.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असतो. अलीकडे रितेशने हैदराबाद विमानतळावरचे दोन व्हिडीओ शेअर केलेत. हैदराबाद विमानतळावरील निष्काळजीपणाचे चित्र दाखवणारे हे दोन्ही व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. हैदराबाद एअरपोर्टवरील हे दृश्य कुठल्याही मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारे असल्याचे सांगत रितेशने याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
रितेशने २७ मे रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हैदराबाद एअरपोर्टचे दोन व्हिडिओ शेअर केले. यात एअरपोर्ट लॉन्ज येथील आपतकालीन दरवाजा बंद दिसत आहे. आत आणि बाहेर जाण्यासाठी फक्त एलिवेटरचाच पर्याय उपलब्ध आहे. तसेच तांत्रिक बिघाडामुळे एलिवेटर बंद आहे. 




रितेशने पहिला व्हिडीओ २७ मे रोजी पहाटे ५ वाजता शेअर केला आहे. या व्हिडीओत एक्झिट गेटवर कुलूप दिसत आहे. ‘मी यावेळी हैदराबाद एअरपोर्ट लॉन्जमध्ये आहे. आत आणि बाहेर जाण्यासाठी केवळ एलिवेटरचा पर्याय आहे. तेही बंद आहे. आपातकालीन दरवाजा कुलूपबंद आहे. (जणू अपघाताची प्रतीक्षा होतेय ),’ असे हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले आहे.



दुसरा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने विमानतळ प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नेमके बोट ठेवले आहे. ‘ प्रवाशांचे विमान चुकले तरी चालेल पण सुरक्षा कर्मचा-याने दरवाजा उघडला नाही. हैदराबाद विमानतळ प्रशासनाने हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, पब्लिक एग्झिटला बंद करता येत नाही,’असे त्याने लिहिले आहे.
रितेशच्या या ट्वीटनंतर हैदराबाद विमानतळ प्रशासनाने उत्तर देत, प्रवाशांना झालेल्या असुविधेबद्दल खंत व्यक्त केली.   एका तांत्रिक किरकोळ गडबडीमुळे दरवाजा बंद करण्यात आला होता. मात्र अगदी थोड्याच वेळात दार उघडला गेला. विमानतळावर सर्व सुरक्षेची सोय करण्यात आली आहे. तसेच आपतकालीन स्थिती काचेचा दरवाजा तोडला जाऊ शकतो. प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Web Title: riteish deshmukh shared hyderabad airport lounge video to address the issue of lock exit door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.