Ritcha Chadha went on the path of Vidya Balan Silk Smita's sister is alive on screen! | ​विद्या बालनच्या मार्गावर निघाली रिचा चड्ढा! सिल्क स्मिताच्या ‘बहिणी’ला करणार पडद्यावर जिवंत!!

सन २०११ मध्ये आलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन हिने साऊथ अभिनेत्री सिल्क स्मिताला जिवंत केले होते. सिल्क स्मितानंतर आणखी एका साऊथच्या अशाच एका बोल्ड अभिनेत्रीचे आयुष्य पडद्यावर जिवंत होणार आहे. होय, ही अभिनेत्री म्हणजे, साऊथची अ‍ॅडल्ट स्टार शकीला. होय. १९९० च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री शकीलाच्या आयुष्यावर बायोपिक येतेयं. या बायोपिकमध्ये अभिनेत्री रिचा चड्ढा शकीलाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
शकीला केरळची होती. तिने तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा अनेक भाषांतील बी ग्रेड चित्रपटांत काम केले. विशेष म्हणजे,   सिल्क स्मिता हिच्याच ‘प्ले गर्ल्स’ या चित्रपटातून शकीलाने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. या चित्रपटात तिने सिल्क स्मिताच्या छोट्या बहीणीची भूमिका साकारली होती. इथपासून सुरु झालेला शकीलाचा संपूर्ण प्रवास या बायोपिकमध्ये दाखवला जाणार आहे. निश्चितपणे शकीलाची भूमिका साकारण्यास रिचा प्रचंड उत्सूक आहे. खुद्द रिचाने याबद्दल माहिती दिली. १९९० च्या दशकात मल्याळम सिनेमाची बोल्ड अभिनेत्री शकीला हीची कथा घेऊन मी येतेयं. शकीलाचे चाहते आशियाभर पसरलेले आहेत. एक महिला कलाकार म्हणून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याकाळात हे सोपे नव्हते. येत्या एप्रिल व मे महिन्यात या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, असे रिचाने सांगितले. इंद्रजीत लंकेश हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

ALSO READ :  ‘3 स्टोरीज’ हे नवे पोस्टर आहे खास, समजण्यासाठी घ्यावे लागतील थोडे कष्ट!

रिचा चड्ढाबद्दल सांगायचे तर रिचाने ‘ओए लकी लकी ओए’ या चित्रपटापासून तिच्या कारकिदीर्ला सुरुवात केली. त्यानंतर ‘गँग्स आॅफ वासेपूर’,‘फुकरे’, ‘मसान’ यांसारख्या चित्रपटात तिने भूमिका साकारल्या. रिचाने आज बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अर्थात यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला. बॉलिवूडमध्ये कुणीही गॉडफादर नसल्याने बॉलिवूडमध्ये स्थिरावणे तिला बरेच जड गेले. पण रिचाने स्वबळावर यश मिळवले. 
Web Title: Ritcha Chadha went on the path of Vidya Balan Silk Smita's sister is alive on screen!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.