जगातील सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणा-या ‘मिस वर्ल्ड’ यासौंदर्यस्पर्धेचाचा यंदाचा मुकुट भारताच्या मानुषी छिल्लरने पटकावला. १७ वर्षांपूर्वी म्हणजे सन २००० मध्ये प्रियांका चोप्रा हिने हा मुकुट जिंकला होता. प्रियांकानंतर मानुषीने हा ताज पटकावला आणि हा किताब पटकावणारी ती भारताची सहावी सौंदर्यवती ठरली. मानुषीच्या आधी कुणी कुणी ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला, यावर एक नजर...

रिता फारिया७ नोव्हेंबर १९६६ रोजी भारताच्या रिता फातिया हिने ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट जिंकला होता. मिस वर्ल्ड बनणारी ती पहिली भारतीय महिला होती. ती पहिली अशी मिस वर्ल्ड होती, जी पेशाने डॉक्टर होती. रीताचा जन्म १९४६ साली झाला होता.

ऐश्वर्या राय१९९४ चा ‘मिस वर्ल्ड’चा किताब ऐश्वर्या राय हिने पटकावला होता. हा किताब पटकावणारी ती दुसरी भारतीय महिला होती. २०१४ व्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेदरम्यान ऐश्वर्याला चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आले होते. शिवाय तिला ‘मोस्ट सक्सेसफुल मिस वर्ल्ड’च्या सन्मानाने गौरविले गेले होते.

डायना हेडनहैदराबादेतील डायना हेडन हिने १९९७ च्या ‘मिस वर्ल्ड’ किताबावर आपले नाव कोरले होते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर डायना बॉलिवूडमध्ये आली. पण तिला फार यश मिळवता आले नाही.

युक्ता मुखी४ डिसेंबर १९९९ मध्ये युक्ता मुखी हिच्या शिरावर ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट चढला होता. ९३ देशांच्या सौंदर्यवतींना मागे टाकत तिने हा मुकुट मिळवला होता. युक्ता मुखीने २००२ मध्ये आफताब शिवदासानीसोबत ‘प्यासा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण तिचा हा चित्रपट दणकून आपटला होता.

प्रियांका चोप्रासन २००० मध्ये प्रियांका चोप्रा हिने ‘मिस वर्ल्ड’च्या मुकुटावर आपले नाव कोरले होते. ‘मिस वर्ल्ड’ बनल्यानंतर ‘द हिरो’मधून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. यानंतर एकापाठोपाठ एक हिट सिनेमे देत प्रियांकाने बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख निर्माण केली. सध्या ती हॉलिवूडमध्ये बिझी आहे.

 मानुषी छिल्लरALSO READ : SEE PICS : ​ ‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब जिंकणा-या मानुषी छिल्लरबद्दल काही खास गोष्टी...!

यंदाचा २०१७ चा ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट मानुषी छिल्लरने जिंकला आहे.  जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे ?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर मानुषीने ‘आई’हे एक असे प्रोफेशन आहे, जिला सर्वात जास्त आदर आणि पगार असायला हवा, असे सांगितले.जगातील प्रत्येक माता तिच्या मुलांसाठी असंख्य तडजोडी करत असते,असेतीम्हणाली.मानुषीच्या या उत्तराने परीक्षकांना प्रभावित केले.
Web Title: Rita Faria to Manushi Chillar! Miss World 'crown by Indian beauty!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.