Rishi Kapoor had put in the song 'Ladies' Pant! Read, a funny anecdote !! | ​‘या’ गाण्यात ऋषी कपूर यांनी घातली होती लेडिज पॅन्ट! वाचा, एक मजेशीर किस्सा!!

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे त्यांच्या अभिनयासोबतच कमालीचा ‘सेन्स आॅफ ह्युमर’ आणि बिनधास्त बोलण्यासाठी ओळखले जातात. चित्रपटांच्या दुनियेतले एकापेक्षा एक लज्जतदार, खमंग अन् मजेशीर किस्से चाहत्यांना ऐकवणे हा त्यांचा आवडता छंद. एकदा त्यांनी असाच एक मजेशीर खुलासा केला होता. तो सुद्धा सोशल मीडियावर.होय, हा किस्सा होता  ऋषी यांच्याच ‘जहरिला इन्सान’ या सिनेमाच्या सेटवरचा. या सिनेमाच्या एका गाण्यात ऋषी यांनी अजानतेपणी लेडिज पॅन्ट घातली होती. खुद्द ऋषी यांनीच हा मजेशीर किस्सा शेअर केला होता. त्याकाळात ऋषी कपूर स्वत:चे शॉपिंग स्वत: करायचे. त्या दिवसात ऋषी कपूर बेअरूतला गेले होते. तिथे  खरेदी करताना एक टाइट फिटिंगची पॅन्ट त्यांना जाम आवडली. ऋषी यांनी लगेच ती खरेदी केली. ही पॅन्ट त्यांना इतकी आवडली होती की, त्यांनी ती ‘जहरिला इन्सान’च्या ‘ओ हंसिनी’ या गाण्याच्या शूटींगदरम्यान घालण्याचे ठरवले. हीच पॅन्ट घालून त्यांनी हे अख्खे गाणे पूर्ण केले. शूट पूर्ण झाल्यावर ऋषी यांच्या डिझाईनरला या पॅन्टची चेन म्हणजेच झिप फ्रन्टऐवजी साईडला असल्याचे लक्षात आले आणि तेव्हा कुठे या फॅशन ब्लंडरचा खुलासा झाला. अर्थात तोपर्यंत सगळे शॉट ओके झाले होते.  या गाण्यात ऋषी यांच्या अपोझिट मौसमी चॅटर्जी दिसली होती.

ALSO READ : ऋषी कपूर यांचा गेला ‘तोल’; मुलगा रणबीर कपूरला मागावी लागली माफी!

‘ओ हंसिनी’च्या शूटवरचा हा किस्सा पुढे अनेक वर्षानंतर म्हणजेच २००५ मध्ये त्रषी यांनी चाहत्यांशी शेअर केला होता. निश्चितच तो शेअर करतानाही ते तितकेच हसले असतील, जितके हे त्यादिवशी सेटवर हसले असतील.
गतवर्षी प्रकाशित झालेल्या आपल्या  ‘खुल्लम खुल्ला-ऋषी कपूर अनसेंसर्ड’ नामक बायोग्राफीतही ऋषी यांनी अशाच अनेक मजेशीर व काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. जे  खुल्लम खुल्ला  सांगता येणार नाही, ते ऋषी कपूर यांनी आपल्या बायोग्राफीमध्ये सांगितले आहे. आपल्या वडिलांचे म्हणजे राज कपूर यांचे काही ‘राज’ही ऋषी यांनी या बायोग्राफीत उघड केली आहेत. 
Web Title: Rishi Kapoor had put in the song 'Ladies' Pant! Read, a funny anecdote !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.