Rigid disclosure of sexual harassment; Many actors on the radar! | लैंगिक शोषणावरून ऋचा चढ्ढाचा धक्कादायक खुलासा; अनेक अभिनेते रडारवर!

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिचा या आठवड्यात ‘फुकरे’चा सीक्वल ‘फुकरे रिटन्स’ रिलीज होत आहे. या चित्रपटात भलेही ती एका हटके भूमिकेत दिसत असली तरी, वास्तविक जीवनात ती लैंगिक शोषणाला बळी पडली आहे. होय, कदाचित हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल परंतु याबाबतचा खुलासा स्वत: ऋचाने केला आहे. ‘फुकरे रिटन्स’मध्ये रिचा भोली पंजाबन ही अतिशय हटके अशी भूमिका साकारत आहे. चित्रपटातील तिचा डॅशिंग अंदाज बघून तिच्यासोबत असे काही घडले असेल असा कोणी विचारही करणार नाही. परंतु ऋचाने एका मुलाखतीत हा धक्कदायक प्रकार सांगितला आहे. 

ऋचाने म्हटले की, जर बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाविषयी चर्चा केली तर बरेचसे अभिनेते आणि अन्य लोक केवळ त्यांचे कामच नव्हे तर नावही गमावून बसतील. ऋचाला सामाजिक मुद्द्यावर बिनधास्त बोलण्यासाठी ओळखले जाते. यावेळी तिने लैंगिक शोषणावर आपले मत मांडताना म्हटले की, जे निर्माते आणि दिग्दर्शक महिलांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करून स्वत:ला प्रगतशील असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते सर्व लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर येताच उद्ध्वस्त होतील. जर हॉलिवूडप्रमाणेच बॉलिवूडमध्येही अशाप्रकारचा मुद्दा चर्चिला गेला तर सर्व काही बदलून जाईल. 

हॉलिवूड निर्माता हार्वे वेन्स्टाइन याच्यावर तब्बल ५१ अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर संपूर्ण जगभर --- हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जगातील विविध महिलांनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज बुलुंद केला. बॉलिवूडमधीलही काही अभिनेत्रींनी यावर बोलण्याचे धाडस केले. आता यामध्ये अभिनेत्री ऋचा चढ्ढाचेही नाव जोडले गेले आहे. परंतु ऋचाने हे सांगताना नावांचा खुलासा केला नसल्याने तिचा रोष नेमका कोणाकडे हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.
Web Title: Rigid disclosure of sexual harassment; Many actors on the radar!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.