Richa Chadha tells me, if she does not have an actress, then I am in this profession | ​रिचा चढ्ढा सांगतेय, अभिनेत्री नसते तर मी असते या प्रोफेशनमध्ये

रिचा चढ्ढाने २००८ मध्ये ओय लकी, लकी ओय या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने आजवर गँग्स ऑफ वास्सेपूर, फुकरे, सरबजीत, फुकरे रिटर्न्स, मसान यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गँग्स ऑफ वास्सेपूर, फुकरे, मसान यांसारख्या तिच्या चित्रपटांतील भूमिकांना पुरस्कार देखील मिळाले आहेत. आज बॉलिवूडमध्ये तिने तिच्या अभिनयाने तिचे एक स्थान निर्माण केले आहे. अभिनय क्षेत्रात यायचे असे तिने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. पण अभिनेत्रक्षेत्रात कारकिर्द करण्याची संधी मिळाली नसती तर तिने कोणत्या क्षेत्रात तिचे करियर केले असते हे तिने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. रिचाला प्रवासाची आवड असल्याने त्या संबंधितच करियर करण्याची तिची इच्छा होती. याविषयी रिचा सांगते, मी अभिनेत्री नसते तर एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये असते. मला कधीच नोकरी करण्याची आवड नव्हती. त्यामुळे मी कधी नोकरी तर नक्कीच केली नसती. पण मी जगभर हिंडून प्रवासवर्णन लिहिणारी ब्लॉगर झाले असते किंवा छायाचित्रकार बनले असते. मी नक्कीच काहीतरी कलात्मक काम केले असते.
रिचा चढ्ढा गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता अली फजलला डेट करत असल्याची चर्चा आहे. याविषयी देखील तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले आहे. याविषयी ती सांगते, मी सध्या एका अभिनेत्याच्या प्रेमात पडले असून तो हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्येही चांगलाच सक्रिय आहे.
तिचा ‘फुकरे रिटर्न्स’ हा चित्रपट १ एप्रिलला झी सिनेमावर दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. तिला या चित्रपटातील तिच्या भूमिकेसोबतच चूचाची भूमिका खूपच आवडते. ती याविषयी सांगते, या चित्रपटात मी भोलीची व्यक्तिरेखा साकारली नसती तर मला चूचाची व्यक्तिरेखा साकारायला फार आवडलं असतं. तो पार वेडा आहे. त्याच्या विचित्र स्वप्नांमुळे आणि त्याच्या अंत:प्रेरणेमुळेच आम्हाला धनलाभ होतो.

Also Read : कंडोम जाहिरातीच्या प्रसारण बंदीवर रिचा चढ्ढाने म्हटले, ‘लोकसंख्येच्या बाबतीत आपल्याला चीनच्या पुढे जायचे की नाही?’ 

Web Title: Richa Chadha tells me, if she does not have an actress, then I am in this profession
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.