REVEALED: सलमान खानने का सुरू केले नाही ‘दबंग3’चे शूटींग? अरबाज खानने केला मोठ्ठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 09:17 PM2018-10-25T21:17:10+5:302018-10-25T21:17:42+5:30

‘दबंग3’ या चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे़ याच चित्रपटाबद्दल एक ताजी खबर आहे. खरे तर सलमान खान यावर्षीच्या अखेरिस ‘दबंग3’चे शूटींग सुरू करणार होता.

REVEALED: revealed dabangg 3 shooting will start from february or march 2019 says arbaaz khan | REVEALED: सलमान खानने का सुरू केले नाही ‘दबंग3’चे शूटींग? अरबाज खानने केला मोठ्ठा खुलासा

REVEALED: सलमान खानने का सुरू केले नाही ‘दबंग3’चे शूटींग? अरबाज खानने केला मोठ्ठा खुलासा

googlenewsNext

‘दबंग3’ या चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे़ याच चित्रपटाबद्दल एक ताजी खबर आहे. खरे तर सलमान खान यावर्षीच्या अखेरिस ‘दबंग3’चे शूटींग सुरू करणार होता. ‘भारत’ आणि ‘दबंग3’ हे दोन्ही चित्रपट एकाचवेळी शूट करण्याचा सलमानचा प्लान होता. यापैकी ‘दबंग3’ यावर्षीच्या अखेरिस रिलीज होणार होता आणि ‘भारत’ पुढीलवर्षी ईदच्या मुहूर्ताला. पण ‘रेस3’ रिलीज झाल्यानंतर सलमानने अचानक आपला प्लान बदलला आणि केवळ ‘भारत’चे शूटींग सुरू केले. असे का? याचे उत्तर आत्ताकुठे अरबाज खानने दिले आहे. होय, अलीकडे एका ताज्या मुलाखतीत अरबाज यावर बोलला. सलमान खान एका वेळी केवळ एकाच चित्रपटावर लक्ष देऊ इच्छित होता. त्यामुळे त्याने यावर्षी केवळ ‘भारत’चे शूटींग सुरू केले. या चित्रपटाचे शूटींग संपल्याबरोबर तो ‘दबंग3’चे शूटींग सुरू करेल,असे अरबाजने सांगितले. आम्ही ‘दबंग3’ची स्क्रिप्ट फायनल केली आहे. प्रभुदेवा आणि सलमान खान पुढील वर्षी फेबु्रचारी आणि मार्चपर्यंत ‘दबंग3’चे शूटींग सुरू करेल, असेही अरबाजने सांगितले.
काही दिवसांपूर्वी सलमानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘दबंग3’साठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे म्हटले होते. २०१९ मध्ये चुलबुल पांडेला भेटण्यासाठी तयार राहा, असेही तो आपल्या ट्विटमध्ये म्हणाला होता.  २०१० मध्ये ‘दबंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग2’ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

Web Title: REVEALED: revealed dabangg 3 shooting will start from february or march 2019 says arbaaz khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.