Return gift to her fans by Kareena Kapoor | ​करिना कपूरने दिले तिच्या चाहत्यांना रिटर्न गिफ्ट

करिना कपूरचा आज वाढदिवस असून तिच्यासाठी हे गेले वर्षं खूपच चांगले गेले. तिच्या करियरच्या दृष्टीने हे वर्षं चांगले होते यात काही शंकाच नाही. २०१६ मध्ये अर्जुन कपूर सोबतचा तिचा की आणि का हा चित्रपट यशस्वी ठरला. त्यानंतर आलेल्या उडता पंजाब या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे देखील कौतुक करण्यात आले. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. तिला या चित्रपटासाठी अनेक नामांकनं देखील मिळाली होती. त्यामुळे २०१६ ला तिला व्यवसायिकदृष्ट्या चांगलेच यश मिळाले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. वैयक्तिक आयुष्यात तर तिच्यासाठी २०१६ हे वर्षं खूपच चांगले होते. कारण या वर्षी तिच्या आयुष्यात एक छोटासा चिमुरडा आला. 
करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या आयुष्यात २० डिसेंबर २०१६ला तैमूरचे आगमन झाले. करिना सध्या तिचे वैयक्तिक आणि व्यवासायिक आयुष्य यांच्यात खूपच चांगल्याप्रकारे ताळमेळ घालत आहे. तिने वीर दी वेडिंग या चित्रपटाच्या चित्रीकऱणाला सुरुवात देखील केली आहे. ती चित्रीकरणातून वेळ काढून तैमूरसोबत खूप चांगला वेळ ती घालवत असते. ती सध्या सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळातच काम करते. त्यामुळे तिला तैमूरला वेळ देता येतो. एवढेच नव्हे तर अनेकवेळा तैमूर देखील आईच्या सेटवर तिला भेटायला जातो. करिनाचे सगळे आयुष्य आता तैमूरच्या आजूबाजूला फिरते आहे. 
करिनाच्या  इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील करिना तैमूरचे विविध फोटो पोस्ट करत असते. करिनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या फॅन्सनी तिला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा वाढदिवस खूप स्पेशल केला आहे आणि त्यामुळे करिनाने तिच्या चाहत्यांना वाढदिवसाचे खूप चांगले रिटर्न गिफ्ट दिले आहे. तिने तैमूरचा एक क्युट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत तो गार्डनमध्ये बसलेला दिसत आहे. त्याच्या हातात एक फूल असून त्या फूलासोबत खेळण्यात तो बिझी आहे. या फोटोसोबत सर्वात क्युट बाळ असे कॅप्शन देखील करिनाने दिले आहे. करिनाने तिच्या चाहत्यांना दिलेले हे रिटर्न गिफ्ट त्यांना खूप आवडेल यात काही शंकाच नाही. 

Also Read : करिना कपूरचा मुलगा तैमुर अली खान आणि तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य कपूरची जमली गट्टी
Web Title: Return gift to her fans by Kareena Kapoor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.