Released in the beauty of Rekha, 'O' the Indian billionaire, shared the music and shared the praise! | रेखा यांच्या सौंदर्यावर फिदा झाले ‘हे’ भारतीय अरबपती, व्हिडीओ शेअर करून उधळली स्तुतिसुमने!

चित्रपटसृष्टीत आपल्या अदा आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाºया अभिनेत्री रेखा यांचा जलवा अजूनही त्यांच्या चाहत्यांवर कायम आहे. प्रत्येक स्तरातील प्रेक्षक त्यांच्या सौंदर्याचा दिवाना असून, आजही त्यांची एक झलक प्रेक्षकांसाठी पर्वणीप्रमाणे ठरते. या यादीत भारतातील एका उद्योगपतींचाही समावेश असून, रेखाचे कौतुक करण्यास त्यांना अजिबातच दम लागत नाही. वास्तविक त्यांनी पहिल्यांदाच रेखा यांचे कौतुक केले असे नाही तर यापूर्वीही ते रेखा यांचे गोडवे गाताना दिसले. मात्र यावेळेस ६३ वर्षीय रेखाचा परफॉर्मन्स बघून अरबपती आनंद महिंद्रा स्वत:च्या भावना थांबवू शकले नाहीत. त्यांनी ट्विट करून रेखा यांच्या सौंदर्याचे कौतुक करताना त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. 

आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी लोकांना बºयाचदा असे म्हणताना ऐकले की, वय केवळ एक संख्या आहे. पण एक फोटो किंवा एक व्हिडीओ हा हजारो शब्दांच्या समान असतो अन् या व्हिडीओत आधीच्या म्हणीपेक्षा जास्त प्रभाव जाणवतो. शाश्वत तारूण्याचे दर्शन दिल्याबद्दल रेखाजी तुमचे धन्यवाद!’ वास्तविक रेखा यांचा हा व्हिडीओ सुपर डान्सर या रिअ‍ॅलिटी शोमधील आहे. व्हिडीओमध्ये रेखा लहान मुलांसोबत ‘इन आॅँखो की मस्ती के’ या सुपरहिट गाण्यावर परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. 
 
गाण्यामध्ये रेखा यांचा अंदाज घायाळ करणारा असून, त्यांच्या सौंदर्याची जाणीवही करून देतो. रेखा यांचा परफॉर्मन्स बघून अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि कोरिओग्राफर गीता कपूर यांना काय प्रतिक्रिया द्यावी हेच सूचत नाही, तर स्पर्धक अशरक्ष: रेखा यांच्यासमोर लोटांगण घालताना दिसतात. कदाचित हीच बाब आनंद महिंद्रा यांनाही भावली असल्याने त्यांनी आपल्या शब्दांना मोकळी वाट करून दिली. 

गेल्या १७ डिसेंबर रोजी रेखा यांना स्मिता पाटील मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी रेखा यांनी आपल्या तुलनेत स्मिता पाटील या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असल्याचे म्हटले होते. भारतीय चित्रपटसृष्टीत विशेष योगदान दिल्याबद्दल रेखा यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. दरम्यान, उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामध्येही सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. स्कॉर्पियो आणि बोलेरोसारख्या ब्रॅण्डचे मालक असलेल्या आनंद महिंद्रा यांचा बिझनेस अम्पायर आॅटो, बँकिंग आणि रिअल स्टेटपर्यंत पोहोचला आहे. 
Web Title: Released in the beauty of Rekha, 'O' the Indian billionaire, shared the music and shared the praise!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.