Release of 'Zero' teaser! Shahrukh Khan gave Idi to fans! | ‘झिरो’चा टीजर रिलीज! शाहरूख खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’!

शाहरूख खानचा आगामी चित्रपट ‘झिरो’चा नवा टीजर रिलीज झालाय. खरे तर हा टीजर ईदच्या दिवशी रिलीज केला जाईल, असे मानले जात होते. पण शाहरूखने त्यापूर्वीचं आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत, ‘झिरो’चा टीजर रिलीज केला. या टीजरमध्ये शाहरूख खान व सलमान खान एकत्र थिरकताना दिसताहेत.
२१ सेकंदाचा हा टीजर पाहून चित्रपटाबद्दल फार काही कळत नाही. म्हणजे, चित्रपटाची कथा, शाहरूखचे पात्र याबद्दल सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. चित्रपटात अनुष्का शर्मा व कॅटरिना कैफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पण त्यांचे लूकही अद्याप रहस्य ठेवण्यात आले आहे. या २१ सेकंदाच्या टीजरमध्ये शाहरूख मात्र जमून आला आहे. त्याचे बुटके असणे, कुठेही खटकत नाही. टीजरमधील शाहरूख व सलमानची जोडीही मस्त दिसतेय.तुम्हाला माहित असेलच की, आनंद एल राय दिग्दर्शित याचित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. यंदा २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. टीजर पाहून लोकांची उत्सुकता ताणली आहे. या चित्रपटात  सलमान खान एका विशेष भूमिकेत दिसणार आहे .त्याची भूमिकाही सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे.  

ALSO READ : ​ शाहरूख खानच्या ‘झिरो’मध्ये दिसणार इंटरनेट सेन्सेशन मल्लिका दुआ!

  ‘झिरो’त  अनुष्का शर्मा एका यशस्वी महिला शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे. तर कॅटरिना कैफ एका व्यसनी हिरोईनची भूमिका साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट या सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. एका गाण्यात सलमान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीही झळकणार आहेत.  श्रीदेवींनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या वाट्याचे सीन शूट केले होते. त्याअर्थाने ‘झिरो’ हा श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे.  
Web Title: Release of 'Zero' teaser! Shahrukh Khan gave Idi to fans!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.