Release of second song teaser from Saif Ali Khan's Kalakandi | सैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज

काही महिन्यांपूर्वीच सैफ अली खानचा शेफ चित्रपट रिलिज झाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली फारशी कमाल दाखवू शकला नाही. सैफ शेफ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. तरी सैफने आशा सोडल्या नाहीत. सैफ पुन्हा एकदा  'कालाकांडी'मधून आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. मेकर्स ने या चित्रपटातचा ट्रेलर आणि पहिले गाणं 'स्वैगपुर का चौधरी' रिलीज केले आहे. आता चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. गाण्याचे बोल आहेत 'काला डोरया' जे एक पंजाबी पार्टी साँग आहे.   या चित्रपटात सैफ शिवाय कुणाल रॉय कपूर, विजय राज, अमायरा दस्तूर, दीपक डोबरियाल, अक्षय ओबरॉय, ईशा तलवार, नील भूपलम, शिवम पाटील सारखे कलाकार आहेत.  हा चित्रपट 12 जानेवारी 2018 ला रिलीज होणार आहे.  या चित्रपटाद्वारे अक्षत वर्मा डायरेक्शन डेब्यू करतो आहे. यापूर्वी अक्षतने ‘डेल्ही बेली’ची पटकथा लिहिली होती 
चित्रपटाच्या ट्रेलरमधून एक डार्क कॉमेडी थ्रीलर आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात ७३ कट्स सांगितले होते. आता  ‘कालाकांडी’च्या ट्रेलरमध्ये बोल्ड सीन्स आणि शिव्यांची भरमार आहे. सैफ कॅन्सरने पीडित असल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. सैफला पोटाचा कॅन्सर असल्याचे निदान होते. तुला आनंद मिळेल, त्या सगळ्या गोष्टी कर, असे डॉक्टर त्याला सांगतात. नंतर सैफ वेगवेगळ्या झोनमध्ये जातो, असे ट्रेलरमध्ये दिसते. याचदरम्यान ट्रेलरमध्ये दीपक डोबरियाल आणि विजय राज यांची एन्ट्री दाखवली आहे. हे दोघेही पैशाचे लोभी असतात. शोभिता धुलिपाला आणि कुणाल राय कपूर यांचे प्रेम आणि अक्षय ओबेरॉय याची वासना हेही ट्रेलरमध्ये दिसले. चित्रपटाचे ट्रेलर कुठेतरी तुम्हाला ‘डेल्ही बेली’ची आठवण करून देतो. पण सुरवातीपासूनच ट्रेलर तुम्हाला बांधून ठेवतो आणि पूर्ण बघण्यासाठी प्रवृत्त करतो. सैफची विचित्र हेअरस्टाईल, त्याचे फरकोटमधील लूक सगळेच तुमच्या मनात उत्सुकता निर्माण करते. डार्क कॉमेडी सिनेमात बोल्डनेसचा तडकाही असणार आहे.
ALSO READ :  Christmas Party:​ ख्रिसमस पार्टीत पोहोचला तैमूर अली खान, मॉम -डॅडसोबत दिली झक्कास पोज!
Web Title: Release of second song teaser from Saif Ali Khan's Kalakandi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.