Release of Motion Teaser of 'Purna' directed by Rahul Bose | ​राहुल बोस दिग्दर्शित ‘पूर्णा’चा मोशन टीझर रिलीज

मागील वर्ष हे बॉलिवूडसाठी बायोपिक ईअर होते असे म्हंटल्यास चुकीचे ठरणार नाही. यावर्षी देखील अनेक बायोपिक रिलीज होणार असल्याचे दिसतेय. मागील वर्षी सर्वांत क मी वयाचा मॅरेथॉन धावक बुधिया सिंग याच्यावर बायोपिक रिलीज झाला होता. लहान वयात अद्वितीय कामगिरी करणाºया पूर्णा मलावथ हिच्यावर आधारित बायोपिक लवकरच रिलीज केला जाणार आहे. पूर्णाने १३ व्या वर्षी जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले होते. तिच्यावर आधारित ‘पूर्णा’ या चित्रपटाचा मोशन टीझर दिग्दर्शक राहुल बोस याने रिलीज केला आहे. माऊंट एव्हरेस्ट सर सर्वात कमी वयाची महिला होण्याचा मान मिळविणारी पूर्णा मलावथ हिने २५ मे २०१४ रोजी एव्हरेस्ट सर केले होतो. एका आदिवासी मुलीने ही कामगिरी केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. पूर्णा मलावथ हिच्या कामगिरीवर चित्रपट तयार करण्याची घोषणा मागील वर्षी अभिनेता राहुल बोसने केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून राहुल बोसने दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. या चित्रपटाचा मोशन टीझर रिलीज करताना राहुल बोसने लिहलेय, ‘मला आताही विश्वास बसत नाही की, १३ वर्षीय आदिवासी मुलीने एव्हरेस्ट सर केल आहे. हा चित्रपट ३१ मार्च रोजी रिलीज केला जाणार आहे. 


पूर्णा मलावथ

मालवथ हिच्यावर आधारित चित्रपटाचे पोस्टर दक्षिण आफ्रि केतील सर्वांत उंच शिखर माउंट किलीमंजारो येथून रिलीज करण्यात आले होते. या चित्रपटाच्या सुरुवातीला हा लघुपट असेल अशी चर्चा होती मात्र, यावर राहुल बोसने हा एक संपूर्ण चित्रपट आहे असे सांगून चर्चान विराम दिला होता. पूर्णा तेलंगाणा राज्यातील आदिवासी मुलगी आहे. पूर्णा एव्हरेस्ट सर करण्यापूर्वी कोणत्याच शिखरावर चढली नव्हती. एव्हरेस्ट सर करण्यासाठी तिने १० नेपाळी शेळपाळासोबत तिब्बतेकडील पर्वत रांगातून सुरुवात केली होती. शिखर सर करताना पूर्णाला पॅक्ड फुड व सूप घ्यावे लागले होते. 

On May 25th, 2014 the youngest girl in history unfurled the Indian flag atop Mt. Everest. #Poorna releases 31st March. #MotionPosterpic.twitter.com/AKl8u9PmAr

— Poorna (@PoornaTheFilm) February 21, 2017 ">http://}}}}

Web Title: Release of Motion Teaser of 'Purna' directed by Rahul Bose
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.