Reason for serial kisar Imran Hashmi bold films because of this reason! | 'या' कारणामुळे सिरीयल किसर इमरान हाशमी बोल्ड चित्रपटांना देतोय नकार!

‘सिरीयल किसर’ या नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेला अभिनेता इमरान हाशमी सध्या बोल्ड चित्रपटांपासून चार हात लांब असल्याचे दिसून येत आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘बादशाहो’ या चित्रपटाच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. चित्रपटात तो अजय देवगण, ईशा गुप्ता, इलियाना डिक्रूज, विद्युत जामवाल यांच्यासोबत बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात इमरान फंकी अंदाजात बघावयास मिळणार असला तरी, त्याची इमेज म्हणावी तशी बोल्ड नाही. इमरान बोल्ड चित्रपटांपासून का दूर पळत आहे? याचा जेव्हा आम्ही शोध घेतला तेव्हा समोर आलेले कारण धक्कादायकच म्हणावे लागेल. 

नुकतेच इमरानने त्याच्या या बोल्ड इमेजविषयी माध्यमांशी चर्चा केली. इमरानने म्हटले की, ‘मी कधीही स्वत:ला या टॅगशी जोडून बघितले नाही. ही चर्चा आपोआपच घडत गेली.’ यावेळी इमरानला विचारण्यात आले की, अखेर हा टॅग (सिरीयल किसर) तुझ्या नावाशी कसा जोडला गेला? यावर उत्तर देताना इमरानने म्हटले की, ‘मला नाही माहीत की ‘सिरीयल किसर’चा अर्थ काय आहे? काही वर्षांपूर्वी जेव्हा मी मॉरीशशमध्ये एका चित्रपटाची शूटिंग करीत होतो, तेव्हा मी एक टी-शर्ट खरेदी केला होता. त्या टी-शर्टवर सीरियल किसर असे लिहिले होते. त्यावेळी माझे एकापाठोपाठ एक असे चार बोल्ड चित्रपट आले होते. चित्रपटात जे मी सीन दिले होते, ते माझ्यासाठी खूपच नॉर्मल होते. परंतु काही लोकांना ते विशेष वाटले. लोकांनी त्यावर चर्चा करण्यास सुरुवात केली. तसेच माझ्या नावासमोर सीरियल किसर हे नावही जोडले. मात्र अशातही मी स्वत:ला कधीच या नावाशी जोडले नाही.’यावेळी इमरानला असेही विचारण्यात आले की, त्याने बोल्ड रोल्स करणे का बंद केले? त्याचे उत्तर देताना इमरानने म्हटले की, ‘आपण अशा देशात राहतो ज्यात अगोदरच प्रेक्षकांनी ठरविलेले आहे की, त्यांना काय बघायला आवडते. भरपूर इरोटिक थ्रिलर्स आणि सिरीयल किसरचे किताब मिळाल्यानंतर मी एका सॅचुरेशन पॉइंटवर पोहोचलो आहे. आता मी असा विचार केला की, मी काहीतरी हटके करायला हवे. त्यानंतर मी ‘आवारापन, जन्नत, शांघाई आणि घनचक्कर’सारखे चित्रपट करण्यास सुरुवात केली. 
Web Title: Reason for serial kisar Imran Hashmi bold films because of this reason!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.