For this reason school children must definitely look 'Padman'! | या कारणासाठी शाळेतल्या मुलांनी जरूर पाहावा 'पॅडमॅन'!

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट पॅडमॅन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन या विषयावर एवढी बिनधास्तपणे चर्चा केली जाते आहे. या चित्रपटाची निर्मिती ट्विंकल खन्ना करते आहे. ट्विंकल खना पॅडमॅन चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. ‘लोकमत’सखी मंच कडून आपल्या सभासदासाठी हा योग जुळून आणला होता. मेगास्टार अक्षयकुमारने त्यांचाशी थेट पुण्यात जाऊन संवाद साधला. यावेळी जवळपास 3000 विद्यार्थी आणि महिला यावेळी उपस्थित होते.  या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले आणि अक्कीने त्याची उत्तर दिली. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन करताना दिसणार आहे. यावेळी संवाद साधताना अक्षयने अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला. अक्षय म्हणाला की, आजही आपण सॅनिटरी नॅपकिन हा शब्द बिनधास्त पणे उच्चारायला घाबरतो. 80 टक्के पेक्षा जास्त महिला नॅपकिनचा उपयोग करत नाही. अर्ध्यापेक्षा जास्त महिलांना या नॅपकिनची माहिती नाही आहे. अक्षयच्या मतं त्याचा हा चित्रपट शाळेतील मुलांना आवर्जून दाखवला पाहिजे. कारण आजची पिढी उद्याचे भविष्य आहेत. पुढे जाऊन अक्षय म्हणाला, फक्त मुलांनी नाही तर त्यांच्या  आई-वडिलांही हा चित्रपट बघावा असे अपील त्यांने यावेळी उपस्थितांना केला. 

ALSO READ :  ‘त्या’ अभिनेत्रीने मासिक पाळी असतानाही भरपावसात रडत-रडत केले शूटिंग : अक्षयकुमार

या चित्रपटात अक्षय कुमार, राधिका आपटे आणि  सोनम कपूरच्या मुख्य भूमिकेत आहेत.चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे; तर सोनम अक्षयवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पॅडमॅन या चित्रपटात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे. 
Web Title: For this reason school children must definitely look 'Padman'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.