For this reason, Salman Khan did not go on stage while doing dance. Arjun Kapoor | ​या कारणामुळे सलमान खान डान्स करताना स्टेजवर फिरकला नाही अर्जुन कपूर

सलमानचे अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्यासोबत खूपच चांगले नाते आहे. सलमान आणि अनिल कपूर यांची मैत्री तर अनेक वर्षांपासून आहे आणि त्यामुळेच सलमान सोनमच्या लग्नाला आवर्जून उपस्थित राहिला होता. एवढेच नव्हे तर सलमानने सोनमच्या रिसेप्शन पार्टीत अनेक गाण्यांवर नृत्य देखील सादर केले होते. सलमान चांगलाच बेफाम होऊन पार्टीत नाचला. सलमानचा मूड खूपच चांगला होता हे सगळ्यांनाच पाहायला मिळाले. सलमानच्या या डान्सची चर्चा सगळीकडेच होत आहे. पण त्याचसोबत आणखी एक गोष्टीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
सलमान सोनमच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचल्यानंतर घडलेली एक गोष्ट प्रसारमाध्यमांच्या नजरेतून चुकली नाही. सलमान त्याची लाडकी मैत्रीण जॅकलिन फर्नांडिससोबत सोनमच्या रिसेप्शनला पोहोचला. तिथे पोहोचल्यावर तो प्रवेशद्वारावरच कॅटरिना कैफशी बोलताना दिसला. सलमानला पाहून तेथील सगळेच खूप खूश झाले होते. सोनमचा काका आणि दिग्दर्शक बोनी कपूरने तर सलमानसोबत गळाभेट घेतली. एवढेच नव्हे तर बोनी यांनी सलमानच्या कपाळावर मुका दिला. बोनी कपूर सलमान आणि यांच्या मैत्रीबाबत सगळ्यांनाच माहीत आहे. बोनी आर्थिक अडचणीत असताना सलमान खानने नो एंट्री या चित्रपटात एकही रुपये न घेता काम केले होते. त्यानंतरही बोनी यांच्या वाँटेड या चित्रपटात देखील सलमान झळकला होता. बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुनला देखील बॉलिवूडमध्ये लाँच करण्यात सलमान खानचा हात होता. अर्जुन सलमान खानला आपला मेन्टॉर मानतो. पण गेल्या कित्येक दिवसांपासून अर्जुन आणि सलमान यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे. सलमानचा भाऊ अरबाजच्या घटस्फोटासाठी अर्जुनच जबाबदार असल्याचे सलमान मानतो. अर्जुन आणि मलाईकाच्या अफेअरची चर्चा सलमानच्या कानावर पडल्यानंतर सलमान अर्जुनसोबत याबाबत बोलला होता. सलमानसोबतच्या संबंधांमुळे बोनी यांनी देखील अर्जुनला मलायकापासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र अर्जुनने कोणाचेही ऐकले नाही. या सगळ्या कारणामुळे सलमान अर्जुनशी बोलणे टाळत आहे. 
या सगळ्या कारणांमुळेच सोनमच्या लग्नात अर्जुन समोर आल्यावर सलमानने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तसेच अनिल कपूर, शाहरुख खान यांच्यासोबत सलमान स्टेजवर नृत्य करत असताना अर्जुन कपूर तिथे फिरकला आहे. 

Also Read : सोनम कपूरच्या लग्नात स्टायलिश अंदाजात अवतरला छोटा नवाब
Web Title: For this reason, Salman Khan did not go on stage while doing dance. Arjun Kapoor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.