तर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 05:52 PM2018-12-15T17:52:02+5:302018-12-15T17:57:09+5:30

प्रियांका चोप्रा-निक जोनासचा लग्न सोहळा आटपून परिणीती चोप्रा पुन्हा कामाला लागली आहे. आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी परी राजस्थानला रवाना झाली आहे

for this reason parineeti chopra ready to work in kesari | तर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला

तर 'या' कारणासाठी परिणीती चोप्रा तयार झाली केसरीमध्ये काम करायला

googlenewsNext
ठळक मुद्देकेसरीमध्ये अक्षय कुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. सिनेमा ऐतिहासिक असल्यामुळे तिनं स्वीकारल्याचे खुलासा परिणीतीने केला आहे

प्रियांका चोप्रा-निक जोनासचा लग्न सोहळा आटपून परिणीती चोप्रा पुन्हा कामाला लागली आहे. आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी परी राजस्थानला रवाना झाली आहे. परी केसरीच्या शूटिंगसाठी राजस्थानला गेलीय. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार दिसणार आहे. अक्षय कुमार आधीपासूनच राजस्थानमध्ये आहे. 

 

केसरीमध्ये अक्षय कुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. तर परिणीतीची यातील भूमिका छोटीशी असल्याची माहिती आहे. पण सिनेमा ऐतिहासिक असल्यामुळे तिनं स्वीकारल्याचे खुलासा परिणीतीने केला आहे. बॉम्बे टाइम्सशी बोलताना ती म्हणाली होती, मला एखाद्या ऐतिहासिक सिनेमात मोठी भूमिका करायचीय. पण आता मी सुरुवात केसरीपासून करणार आहे. सारगढी युद्धाची कहाणी शीख इतिहासात मोठ्या गर्वाने सांगितली जाते. हे युद्ध १८९७ मध्ये झाले होते. ब्रिटिश इंडियन आर्मीसाठी ३६ शीख रेजिमेंटने या युद्धात आपल्या साहसाची ओळख करून दिली होती. आपल्या २१ सैनिकांना घेऊन इश्वर सिंगने १० हजार सैन्याला दोन वेळा पराभूत केले होते. दुर्दैवाने तिसऱ्या वेळेस त्याचा पराभव झाला पण पूर्ण ब्रिटिश आर्मी येईपर्यंत त्यांनी १० हजार सैन्याला थोपवून ठेवले होते. केसरी हा चित्रपट शूरवीर इश्वर सिंगची गोष्ट सांगणार आहे.


 अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना या सिनेमाची को-प्रोडूसर आहे. अक्षयने त्याच्यासाठी हा मोठा प्रोजेक्ट असल्याचे सांगितले होते. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सेटला आग लागली होती. या आगीमध्ये केसरीच्या मेकर्सचे जवळपास 18 कोटींचे नुकसान झाले होते.

Web Title: for this reason parineeti chopra ready to work in kesari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.