For this reason, Karan Singh Deol left the shooting for the movie partially and went to Mumbai | या कारणामुळे करण सिंग देओल चित्रपटाचे शूटिंग अर्धवट सोडून मुंबईत आला

अभिनेता सनी देओलचा मुलगा करण सिंग देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत होता. या चित्रपटात त्याची मुख्य भूमिका आहे. फेब्रुवारीमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरुवात झाली. मात्र मनालीमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु असतानाच करण मुंबईत परतल्याची माहिती स्पॉटबॉय या वेबसाईटने दिली आहे. शूटिंगदरम्यान काही अॅडव्हेंचर दृष करत असाताना करणच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तो चित्रपटाचे शूटिंग अर्धवट सोडून मुंबईत परतला आहे. त्यामुळे चित्रपटात करणची अभिनेत्री असलेल्या साहेर हिने देखील सुट्टी घेतली आहे. करण बरा हेऊन सेटवर आल्यानंतर साहेर शूटिंगसाठी येणार असल्याचे कळते आहे. सध्या सनी देओल मनालीमध्ये जाऊन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करतो आहे. या दुखापतीतून बरं होण्यासाठी करणला दहा ते बारा दिवस लागणार असल्याचे सांगण्यात येते आहे. तसेच डॉक्टरांनी त्याला पूर्ण वेळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 

पल पल दिल के पास हा एक रोमॅण्टिक ड्रामा चित्रपट आहे. सनी देओल स्वत:च चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. या अगोदर सनीने ‘दिल्लगी’ आणि ‘घायल रिर्टन्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सनीच्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे करण देओलच्या चित्रपटालाही असाच काहीसा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून देओल परिवाराची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. ज्यामुळे लोकांमध्ये करणच्या या चित्रपटावरून उत्साह असल्याचे बघावयास मिळते. याआधी करण ज्या ज्याठिकाणी शूटिंगसाठी पोहोचतो तेथे त्याचे चाहते तुफान गर्दी करीत आहेत. या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास, सनीने आपल्या मुलाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी बरेचसे प्रोजेक्ट थांबवून ठेवले आहेत. परंतु मुलाला धडाक्यात लॉन्च करण्यासाठी त्याने हे सर्व प्रोजेक्ट होल्डवर ठेवले आहेत. 
Web Title: For this reason, Karan Singh Deol left the shooting for the movie partially and went to Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.