For this reason, Juhi Rice refused to work with Aamir Khan | ​या कारणामुळे जुही चावलाने आमिर खानसोबत काम करण्यास दिला होता नकार

जुही चावला आणि आमिर खान यांनी मन्सुर खान यांच्या कयामत से कयामत तक या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील दोघांची भूमिका आणि त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटानंतर हम है राही प्यार के, लव्ह लव्ह लव्ह, इश्क यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले. या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत असली तरी ते दोघे इश्क या चित्रपटानंतर प्रेक्षकांना कोणत्या चित्रपटात एकत्र पाहायला मिळाले नाहीत. आमिर आणि जुहीने इश्क या चित्रपटानंतर एकत्र काम का केले नाही याचे कारण ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
इश्क या चित्रपटात प्रेक्षकांना आमिर खान, जुही चावला आणि काजोल, अजय देवगण यांची जोडी पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या एका घटनेनंतर जुहीने आमिरसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. इश्क या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी आमिर खान, जुही जावला, अजय देवगण आणि काजोल हे खूप मजा मस्ती करत असत. जुही आणि आमिर यांनी अनेक वर्षं एकत्र काम केले असल्याने त्या दोघांची तर सेटवर चांगलीच गट्टी जमत असे. इश्क या चित्रपटाच्या सेटवर आमिर खान एकदा चांगलाच मस्तीच्या मुडमध्ये होता. त्यामुळे त्याने जुहीला सांगितले की, मला हात पाहून ज्योतिष सांगता येते. आमिरच्या या गोष्टीवर जुहीने देखील विश्वास ठेवला आणि भविष्य पाहाण्यासाठी तिने तिचा हात पुढे केला. त्यावर जुहीच्या हातावर आमिर चक्क थुंकला. आमिर थुंकल्यानंतर जुही प्रचंड संतापली आणि चिडून सेटवर निघून जात होती. एवढेच नव्हे तर या चित्रपटाचे चित्रीकरण करायला देखील ती तयार नव्हती. त्यावर तिला चित्रपटाच्या टीममधील मंडळींनी कसेतरी समजावले आणि तिने चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यास होकार दिला. पण यापुढे मी कधीच आमिरसोबत काम करणार नाही असे तिने त्या दिवशी ठरवले. त्या प्रसंगानंतर अनेक वर्षं जुही आमिरसोबत बोलत देखील नव्हती. 

Also Read : या कारणामुळे जुही चावलासोबत करत नाही सलमान खान काम
Web Title: For this reason, Juhi Rice refused to work with Aamir Khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.