For this reason Ekta Kapoor does not work with Shah Rukh Khan and Salman Khan | ​या कारणामुळे एकता कपूर काम करत नाही शाहरुख खान आणि सलमान खानसोबत

एकता कपूरने आज छोट्या पडद्यावर तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. एकताच्या मालिका म्हटल्या की, त्या हिट होणारच असेच म्हटले जाते. क्योंकी साँस भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, हम पाच या तिच्या मालिकांनी छोट्या पडद्यावर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तसेच डर्टी पिक्टर, शुटआऊट अॅट लोखंडवाला, वन्स अपॉन टाइम इन मुंबई यांसारखे हिट चित्रपट देखील तिच्या प्रोडक्शन हाऊसने आजवर दिले आहेत. पण एकताच्या आजवरच्या कोणत्याही चित्रपटात आपल्याला सलमान खान अथवा शाहरुख खानसारखे मोठे स्टार पाहायला मिळालेले नाहीत. एकताने या मोठ्या स्टार्ससोबत काम न करण्यामागे एक खास कारण आहे.
एकता कपूरची नागिन ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नागिन ३ मध्ये करिश्मा तन्ना, रतज टोकस यांसारखे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या मालिकेच्या प्रमोशनच्या दरम्यान एकताने दिलेल्या एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. सलमान आणि शाहरुखसारख्या मोठ्या स्टारसोबत आजवर तिने काम का नाही केले याबाबत तिने सांगितले आहे. एकता ही आज आघाडीच्या निर्मात्यांपैकी एक असली तरी शाहरुख, सलमानला आजवर तिच्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळालेले नाही. मोठ्या स्टारसोबत एकता काम करण्याचे का टाळतेय याविषयी ती सांगते, मला मोठ्या स्टार्ससोबत काम करायचे नाहीये किंवा मला कोणत्या मोठ्या स्टारसोबत काही वैयक्तिक समस्या आहे असे नाहीये. माझे सगळ्याच स्टार्ससोबतचे संबंध खूपच चांगले आहेत. पण सलमान, शाहरुख सारखे स्टार म्हटले की, त्यांचे शेड्युल हे नेहमीच व्यग्र असते आणि त्यातही मी देखील प्रचंड बिझी असते. त्यामुळे त्या स्टारच्या आणि माझ्या तारखा जुळणे हे खूप कठीण काम आहे. त्यामुळेच मी आजवर शाहरुख किंवा सलमानसोबत काम केलेले नाही. शाहरुख किंवा सलमानसोबत काम करायचे झाल्यास माझे सहा महिने तरी केवळ प्लानिंग बनवण्यातच जातील असे मला वाटते. मी केवळ एक फोन करून त्यांना माझ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करण्याबाबत नक्कीच विचारू शकते. पण या सगळ्यात माझा किंवा त्यांचा काहीच फायदा नाहीये असे मला वाटते. 

Also Read : या कारणामुळे सलमान खानचे फॅन्स झाले खूश, म्हटले सलमान खान सिंगलच बरा...
Web Title: For this reason Ekta Kapoor does not work with Shah Rukh Khan and Salman Khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.