ह्या कारणामुळे अनिल कपूर यांनी 'चाँदनी'मध्ये श्रीदेवीसोबत काम करण्यास दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 04:51 PM2018-08-11T16:51:06+5:302018-08-11T16:54:23+5:30

'चाँदनी' या चित्रपटात ऋषी कपूर यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी सर्वप्रथम अनिल कपूर यांना विचारण्यात आले होते.

For this reason, Anil Kapoor refused to work with Sridevi in ​​'Chandni' | ह्या कारणामुळे अनिल कपूर यांनी 'चाँदनी'मध्ये श्रीदेवीसोबत काम करण्यास दिला होता नकार

ह्या कारणामुळे अनिल कपूर यांनी 'चाँदनी'मध्ये श्रीदेवीसोबत काम करण्यास दिला होता नकार

googlenewsNext
ठळक मुद्देअनिल कपूर यांनी केला खुलासाअनिल कपूर यांना व्हिलचेअरवर बसून अभिनय करायचा नव्हता

बॉलिवूडमधील काही ऑनस्क्रीन जोड्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. अशा काही लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता अनिल कपूर व अभिनेत्री श्रीदेवी. या दोघांनी 'लम्हे', 'जुदाई', 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातून एकत्र काम केले. या सिनेमातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली आणि या जोडीने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. मात्र एका चित्रपटात श्रीदेवीसोबत काम करण्यास अनिल कपूर यांनी नकार दिला होता. या चित्रपटाचे नाव आहे 'चाँदनी'. 

'चाँदनी' सिनेमात अनिल कपूर यांनी श्रीदेवीसोबत काम करण्यास नकार का दिला असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी सर्वप्रथम अनिल कपूर यांना विचारण्यात आले होते. यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटातून विनोद खन्ना यांचीही महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली होती. पण, हा चित्रपट नेमका अनिल कपूर यांनी का नाकारला याबाबत खुद्द त्यांनीच सांगितले आहे.
एका मुलाखतीत अनिल कपूर यांनी याबाबतचा खुलासा केला. व्हीलचेअरवर बसून अभिनय करण्यासाठी तयार नसल्याचे सांगत त्यांनी हा चित्रपट नाकारला होता. या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्याचा अपघात होतो, ज्यानंतर त्याची बरीच दृश्ये ही व्हीलचेअरवर दाखवण्यात आली होती. आपण कधीच स्वत:ला व्हीलचेअरवर बसल्याचे पाहू शकत नाही, असे म्हणत त्यांनी हा चित्रपट नाकारला होता.
'चाँदनी' नाकारण्यामागे आणखी एक कारण होते ते म्हणजे अनिल यांचा अपघात. या चित्रपटासाठी विचारणा केल्यानंतर अनिल यांचा अपघात झाला होता. ज्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली होती. ज्यानंतर बराच काळ त्याने विश्रांती घेतली होती. याच दरम्यान, आपल्या चित्रपटांची निवड करण्याच्या निकषांवरही त्यांनी पुनर्विचार केला होता. 

Web Title: For this reason, Anil Kapoor refused to work with Sridevi in ​​'Chandni'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.