Read ... what Ranbir Kapoor is telling about his biopic ... | ​वाचा... रणबीर कपूर काय सांगतोय त्याच्या बायोपिकविषयी...

रणबीर कपूर संजय दत्तच्या संजू या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे आणि त्यामुळे या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर लाँच कधी होतोय याची वाट मोठ्या आतुरतेने संजयचे आणि रणबीरचे फॅन्स पाहत होते. नुकतेच 'संजू'चे पहिले पोस्टर आणि टीझरदेखील रिलीज करण्यात आले. या टीझर लाँचच्यावेळी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा रणबीर कपूर उपस्थित होता. त्यावेळी त्याला तुझ्या आयुष्यावर चित्रपट बनवायला आवडेल का असे विचारण्यात आले. त्यावर रणबीरने दिलेले उत्तर खूपच रंजक होते. रणबीरने सांगितले, मी खूपच बोअरिंग व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यावर कोणाला चित्रपट बनवायला आवडेल असे मला वाटत नाही. मी सकाळी चित्रीकरणासाठी घरातून बाहेर जातो आणि रात्री घरी परततो. त्यामुळे माझे आयुष्य काहीच इंटरेस्टिंग नाहीये. माझ्या घरात कोणी बिग बॉससारखा कॅमेरा लावला तर त्यांना ही गोष्ट नक्कीच कळेल. त्यामुळे माझ्या आयुष्यावर कोणी चित्रपट बनवेल असे मला वाटत नाही. 
संजू या चित्रपटाचा पोस्टर पाहताच तुमच्या लक्षात येईल की पहिल्या फोटोत संजय दत्तचे इंडस्ट्रतील सुरुवातीचे दिवस दाखवण्यात येणार आहेत. चित्रपटात 'मुन्ना भाई एमबीबीएस’चित्रपटाचा देखील विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. याला कारण ही तसेच आहे. हा चित्रपट संजय दत्तच्या करिअरमधला टर्निंग पॉईंट ठरला होता. या चित्रपटाने रसिकांची पसंती मिळवलीच होती. तसेच संजय दत्तची इमेज बदलण्यास मदत केली. त्यामुळे संजयच्या आयुष्यात या चित्रपटाला खूप महत्त्व आहे.
संजूची भूमिका साकाराण्यासाठी रणबीर कपूरने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याला या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. हा चित्रपट विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करत आहेत. त्याव्यतिरिक्त विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात महेश भट्ट आणि संजय दत्त हेदेखील गेस्ट अॅपियरेंस करताना बघावयास मिळणार आहे. चित्रपट २९ जून २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Also Read : बराक ओबामा संजय दत्तला ओळखतात या नावाने
Web Title: Read ... what Ranbir Kapoor is telling about his biopic ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.