'' Read script reading role '' | ''स्क्रिप्ट वाचून भूमिका निवडतो''

 केके मेननने आपल्या करिअरची सुरुवात भोपाल एक्स्प्रेस या चित्रपटातून केली. पण केकेला खरी ओळख मिळाली ती  ब्लैक फ्राइडे चित्रपटानंतर. केकेने आतापर्यंतच्या करिअरमध्ये काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे पण ज्या भूमिका त्यांने साकारल्या आहेत त्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडायला तो विसरत नाही. केकेने हैदरमध्ये साकारलेली भूमिका रसिकांच्या आजही लक्षात आहे. लवकरच केके फेमस या चित्रपटात दिसणार आहे याचनिमित्ताने त्याच्या साधलेला दिलखुलासा संवाद  

तुझी फेमसची व्याख्या काय आहे ?
माझ्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर मुंबईत कुठेच लागले नव्हते आणि ज्या चित्रपटाचे पोस्टर लागले तो प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे मला त्याच वेळेला कळेल की तुम्ही प्रसिद्धीच्या मागे धावण्यापेक्षा तुमचा चित्रपट रिलीज होणे आणि प्रेक्षकांनी तो थिएटरमध्ये जाऊ पाहाणे महत्त्वाचे असते. त्यानंतर प्रसिद्धी मिळवण्याच्या गोष्टींकडे मी फारसे लक्ष दिले नाही. मला असे वाटते तुम्ही तुमचे काम  प्रमाणिकपणे केले तर तुम्हाला यश आणि प्रसिद्धी दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळतात. जर फक्त तुम्ही प्रसिद्धीच्या मागे धावत राहिलात तर कदाचित तुम्हाला ती कधीच मिळणार नाही.

तू काही मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसतोस, या मागचे नेमके कारण काय ?
ज्या चित्रपटांच्या ऑफर माझ्याकडे येतात मी त्यांच्यापैकीच एक सिलेक्ट करतो. याचा अर्थ असा ही नाही की खूप चित्रपटांच्या ऑफर माझ्याकडे येतात. मात्र माझ्याकडे आलेल्या स्क्रिप्टपैंकी मला ज्या भावतात ते चित्रपट मी स्वीकारतो. त्यामुळे या मागे काही खास कारण नाहीय. 

तुझ्या या चित्रपटातील भूमिकेविषयी काय सांगशील ? 
'फेमस' हा चित्रपट चंबलच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चंबलमध्येच या चित्रपटाची शूटिंग झाली आहे. यातील प्रत्येक कॅरेक्टरला फेमस व्हायचे असते. मी यात कडक सिंग नावाची भूमिका साकारतो आहे जो पावर हँगरी असतो.

कोणतीही भूमिका साकारताना तू त्याची तयारी कशी करतोस ?
त्याच्यासाठी माझे एकच सूत्र आहे ते म्हणजे स्क्रिप्ट आणि दिग्दर्शकसोबतचा संवाद महत्त्वाचा असतो. कारण गोष्ट ही कल्पानिक असते आणि एक कलाकार म्हणून मला ती सत्यात उतरवायची असते. त्यामुळे तुम्हाला सतत स्क्रिप्ट वाचावी लागते म्हणजे त्या भूमिकाचा उलगडा होतो. मी कधी रोल नाही साकारत मी ती भूमिका साकारतो आणि मला असे वाटते. तसेच तुम्ही साकारत असलेल्या भूमिकेला तुम्ही जज नाही करायला नको. 

केके तू मराठी चित्रपटात काम करणार आहेस त्याविषयी काय सांगशील ?
चित्रपटाची शूटिंग सुरु झाली आहे पण अजून माझे सीन्स शूट होणं अजून बाकी आहे. मी यात दोन मुलांच्या वडिलांची भूमिका साकारतो आहे. या चित्रपटासाठी मी मराठी शिकतो आहे तसे माझे शिक्षण पुण्यात झाल्यामुळे मला बऱ्यापैकी मराठी कळते. चित्रपटाची स्टोरी खूपच इमोशनल आहे. चित्रपटाचा विषय थोडा वेगळा आहे याविषयावर अजून चित्रपट तयार झालेला नाही. जुनी पिढी आणि नवी पिढी यातली वैचारिक मतभेद आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न यात मांडण्यात आले आहे. एका सामाजिक विषयावर यातून भाष्य करण्यात येणार आहे. 
    
Web Title: '' Read script reading role ''
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.