'Razi' strong trailer! A special 'Treat' for Alia Bhatt fans !! | ​‘राजी’चा दमदार ट्रेलर ! आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी एक खास ‘ट्रिट’!!

‘हाईवे’ आणि ‘उडता पंजाब’ यासारखे शानदार चित्रपट देणारी आलिया भट्ट पुन्हा एकदा अशाच धाटणीच्या भूमिकेसाठी तयार आहे. होय, ‘राजी’ या आगामी चित्रपटात एक मुलगी, एक पत्नी आणि एक गुप्तचर अशा एकाचवेळी तीन भूमिका जगताना आलिया दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काहीच वेळापूर्वी रिलीज झाला. ट्रेलर जितका दमदार आहे, तितकीच आलियाची भूमिकाही दमदार आहे, हा आमचा दावा आहे आणि ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हालाही आमचा हा दावा पटेल, ही खात्री आहे. ‘राजी’ हा एका सत्यघटनेवर आधारित चित्रपट आहे. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश एका मोठ्या युद्धाच्या तोंडावर असताना या मुलीला भारताने पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. भारताच्या या मुलीचे एका पाकिस्तानी  अधिकाºयासोबत लग्न होते आणि पाकिस्तानात पोहोचल्यावर भारतीय हेर या नात्याने ती मायभूमीच्या रक्षणासाठी जीवाचे रान करते, असे याचे कथानक आहे. एका साधारण भारतीय मुलीची असाधारण कथा यात पाहायला मिळणार आहे. ‘राजी’च्या ट्रेलरची सुरूवात होते ती भारत-पाक यांच्यातील तणावाने. आलिया यात सहमत नावाचे पात्र साकारते आहे. सहमतचे वडील तिचे लग्न पाकिस्तानच्या एका अधिकाºयाची लावून देतात. तेथे  राहून सहमतला भारतासाठी हेरगिरी करता येईल, एवढाच या लग्नाचा उद्देश असतो. ट्रेलरमध्ये आलिया एक आज्ञाधारी मुलगी, भारताची एक शूर कन्या , एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि एक नीडर गुप्तहेर अशा विविधांगी भूमिकेत दिसतेयं. हा ट्रेलर तुम्हीही पाहा आणि कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

ALSO READ : OMG ! ​ हे काय बोलून गेली आलिया भट्ट!!

आलियासोबत विकी कौशल या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे. येत्या ११ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणाºया या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार हिने केले आहे. संगीतकार गुलजार आणि अभिनेत्री राखी हिची मुलगी अशी मेघनाची एक ओळख आहे. ‘राजी’चे बहुतांश शूटींग काश्मीरात झाले आहे.
Web Title: 'Razi' strong trailer! A special 'Treat' for Alia Bhatt fans !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.