Raveena Tandon made a brilliant fight with Salman Khan | च्विंगमवरून रविना टंडनने सलमान खानशी केले कडाक्याचे भांडण!

‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यात पिवळ्या रंगाच्या साडीत, भिजलेल्या अंगाने बेधडक डान्स स्टेप्स करणाºया अभिनेत्री रविना टंडनचा आजही बॉलिवूडमध्ये जलवा आहे. परंतु तुम्हाला हे माहीत आहे काय? की, रविनाला चित्रपटांमध्ये काम करणे अजिबातच पसंत नव्हते. त्यामुळेच ती शूटिंगच्या वेळी अगदी शुल्लक कारणांवरून वाद घालत असे. एकदा तर तिने चक्क बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्याशी पंगा घेतला होता. होय, रविनाने चक्क च्विंगमवरून सलमानबरोबर वाद घातला होता. त्यावेळी हा वाद बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चेत राहिला होता. 

रविनाचे वडील रवि टंडन चित्रपट निर्माता होते. त्यामुळे तिला अगदी कमी वयात चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा तिला अनेक आॅफर्स मिळत होत्या. मात्र रविना सर्व आॅफर्स धुडकावून लावत होती. परंतु जेव्हा तिला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा तिने लगेचच होकार दिला. ‘पत्थर के फूल’ असे नाव असलेल्या या चित्रपटात सलमान मुख्य भूमिकेत होता. तर त्याची हिरोईन म्हणून रविनाला संधी देण्यात आली होती. त्यावेळी तिचे वय १७ वर्ष इतके होते. शूटिंगदरम्यान शुल्लक कारणांवरून सल्लूशी वाद घालत होती. एकदा चेष्टामस्करीत सलमान खानने तिच्या नाकावर च्विंगम चिटकविले. मात्र ही बाब रविनाने खूपच गंभीरपणे घेतली. तिचा हा संताप झाला की, तिने सलमानबरोबर जोरदार वाद घातला. सलमानशी पंगा घेतल्याने सेटवरही वातावरण गंभीर झाले होते.  बºयाच काळ रंगलेल्या या वादावर दिग्दर्शक तथा चित्रपटाच्या टीमने दोघांमध्ये समझोता घडवून आणला. रविना आणि सल्लूनेही पुढे हा वाद मिटवत शूटिंगला सुरुवात केली. पुढे त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. सलमान आणि रविनामधील ही मैत्री आजही टिकून आहे. रविनाने एका मुलाखतीत म्हटले होते की, जेव्हा मी वाईट काळातून जात होती, तेव्हा सगळ्यांनीच हात वर केले होते. परंतु सलमानने त्यावेळी मला मदत केली. ‘च्विंगमच्या भांडणाने आमच्यात कधीच दुरावा निर्माण केला नाही. उलट आमची मैत्री आणखीन घट्ट केली, असेही रविनाने म्हटले होते. 
Web Title: Raveena Tandon made a brilliant fight with Salman Khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.