Ranvir Singh arrives at Lord's for preparing for this film | या चित्रपटाच्या तयारीसाठी रणवीर सिंग पोहचला लॉर्ड्सवर
या चित्रपटाच्या तयारीसाठी रणवीर सिंग पोहचला लॉर्ड्सवर

ठळक मुद्दे१९८३ च्या वर्ल्डकपवर आधारीत चित्रपट ‘८३’ कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंग


भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरी टेस्ट मॅच नुकतीच लॉर्ड्सवर सुरु झाली. मात्र पावसामुळे सामना रद्द झाला. मात्र हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक कबीर खान पोहचले होते. रणवीर १९८३ साली भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारीत ‘८३’ या चित्रपटात काम करणार आहे. त्याचीच तयारी करण्यासाठी सध्या रणवीर सध्या लॉर्ड्सवर पोहचल्याची बातमी आहे.

 रणवीरने आपल्या इन्स्टावर फोटो पोस्ट करत ‘रेन रेन गो अवे’ म्हणत मॅच सुरु होण्याचा धावा केला होता. 

रणवीर सिंग आणि कबीर खान यांनी यावेळी क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरचीदेखील भेट घेतली आणि त्याच्याबरोबर एक फोटो काढला. कबीर खानने सचिन आणि रणवीर सिंगबरोबरचा आपला हा फोटो पोस्ट केला आहे.

‘१९८३ मध्ये कपिल देव यांना वर्ल्ड कप घेताना याच मैदानावर ९ वर्षीय सचिन तेंडुलकरने पाहिले होते. याच सामन्यामुळे क्रिकेट खेळण्याची प्रेरणा सचिन तेंडुलकरला मिळाली. ३५ वर्षानंतर आता ‘८३’ या चित्रपटाची तयारी आम्ही लॉर्ड्सवर सुरु केली आहे. यापेक्षा अजून चांगलं काय असू शकतं?’ अशी कॅप्शन देत कबीरने आपली भावना व्यक्त केली. तर हाच फोटो सचिननेदेखील आपल्या अकाऊंटवरून पोस्ट करत दोन चांगल्या व्यक्तींना आज भेटलो. कबीर खान आणि रणवीर सिंहला नेहमीच भेटायला आवडते अशी भावना सचिनने व्यक्त केली.

कबीर खान १९८३ च्या वर्ल्डकपवर चित्रपट बनवत असून यामध्ये कपिल देवची भूमिका रणवीर सिंह साकारत आहे. ‘८३’ या चित्रपटाची तयारी सध्या जोरदार चालू असून हा चित्रपट १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होईल. 


Web Title: Ranvir Singh arrives at Lord's for preparing for this film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.