रणवीर सिंगच्या ‘या’ ३ चित्रपटांनी केला ७०० कोटींचा बिझनेस; रेकॉर्ड्समध्ये सलमान खानलाही टाकले मागे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:13 PM2019-07-07T12:13:24+5:302019-07-07T12:14:00+5:30

रणवीर  असा एकमेव अभिनेता आहे ज्याने तिन्ही खानांना आव्हान दिले. आता हेच बघा ना, त्याने म्हणे बॉक्स ऑफिसला तीन चित्रपटांतूनच ७०० कोटींची कमाई करून दिली ज्यामुळे त्याने सलमान खानलाही मागे टाकले आहे.

 Ranveer Singh's '3' films made business worth 700 crores; Salman Khan too behind the records! | रणवीर सिंगच्या ‘या’ ३ चित्रपटांनी केला ७०० कोटींचा बिझनेस; रेकॉर्ड्समध्ये सलमान खानलाही टाकले मागे!

रणवीर सिंगच्या ‘या’ ३ चित्रपटांनी केला ७०० कोटींचा बिझनेस; रेकॉर्ड्समध्ये सलमान खानलाही टाकले मागे!

googlenewsNext

यशराज बॅनरच्या  ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटापासून अभिनेता रणवीर सिंगने आपल्या बॉलिवूडमधील करिअरला सुरूवात केली. सुरूवातीच्या काही वर्षांतच त्याने असे काही काम केले की, बॉक्स ऑफिसवर त्याचा अक्षरश: दबदबा निर्माण केला. रणवीर  असा एकमेव अभिनेता आहे ज्याने तिन्ही खानांना आव्हान दिले. आता हेच बघा ना, त्याने म्हणे बॉक्स ऑफिसला तीन चित्रपटांतूनच ७०० कोटींची कमाई करून दिली ज्यामुळे त्याने सलमान खानलाही मागे टाकले आहे.

२०१८वर्षाच्या सुरूवातीला रणवीर, दीपिका आणि शाहिदचा ‘पद्मावत’ हा चित्रपट रिलीज झाला. निर्माण  झालेल्या वादामुळे चार राज्यांत हा चित्रपट  प्रदर्शित होऊ शकला नाही. तरी देखील चित्रपटाने देशभरात ३०२.१५ कोटी एवढी कमाई केली होती. या चित्रपटातील त्याच्या नेगेटिव्ह भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले. त्यानंतर रणवीर सिंग वर्षाच्या अखेरीस ‘सिम्बा’ या चित्रपटात सारा अली खानसोबत दिसला. २८ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर २४० कोटींचा गल्ला जमवला. 

‘सिम्बा’ चित्रपटाच्या रिलीजनंतर दोन महिन्यांत रणवीरचा ‘गली बॉय’ चित्रपट प्रदर्शित झाला. व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४० कोटींची कमाई केली. दीड वर्षांत तीन चित्रपट आणि कमाई ६८२.१५ कोटींची त्याच्या चित्रपटाने कमाई केली. एवढ्या कमाईत त्याचा समकालीन कोणताही अभिनेता नव्हता. 

अभिनेता रणवीर सिंगच्या तोडीची कमाई तिन्ही खानांपैकी फक्त सलमान खानच्याच कमाईत होती. जुलै २०१५ ते ऑगस्ट  २०१६ दरम्यान बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो आणि सुल्तान चित्रपट रिलीज झाले. या १३ महिन्यात सलमानने ८३०.९५ कोटींची कमाई केली. त्यामुळे रणवीर सिंग भाईजान सलमानवर पण भारी पडला असे म्हणायला काहीच हरकत नाहीये...!!         

Web Title:  Ranveer Singh's '3' films made business worth 700 crores; Salman Khan too behind the records!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.