करण जोहरच्या आगामी सिनेमात करिनाच्या अपोझिट दिसणार रणवीर सिंग ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 12:08 PM2018-08-07T12:08:24+5:302018-08-07T12:39:21+5:30

रणवीर सिंग बॉलिवूडमधला असा अभिनेता बनला आहे ज्याच्यासोबत काम करण्याची प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शकाची इच्छा आहे. सध्या तो रोहित शेट्टी आणि करण जोहरच्या 'सिम्बा'मध्ये बिझी आहे.

Ranveer singh will seen opposite to kareena kapoor in karan johars upcoming movie | करण जोहरच्या आगामी सिनेमात करिनाच्या अपोझिट दिसणार रणवीर सिंग ?

करण जोहरच्या आगामी सिनेमात करिनाच्या अपोझिट दिसणार रणवीर सिंग ?

googlenewsNext
ठळक मुद्दे करण जोहर तर सिम्बानंतर ही रणवीर सिंगसोबत सिनेमा साईन करणार आहेतर  करणने यात करिना आणि आलिया भट्टला सुद्धा साईन केले आहे

रणवीर सिंग बॉलिवूडमधला असा अभिनेता बनला आहे ज्याच्यासोबत काम करण्याची प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शकाची इच्छा आहे. सध्या तो रोहित शेट्टी आणि करण जोहरच्या 'सिम्बा'मध्ये बिझी आहे. आपल्या अभिनयाच्या कौशल्याने त्यांने करण जोहर आणि रोहित शेट्टीला इंप्रेस केले आहे. करण जोहर तर सिम्बानंतर ही रणवीर सिंगसोबत सिनेमा साईन करणार आहे. या सिनेमात दोन हिरो असणार आहेत. ऐवढेच नाही तर  करणने यात करिना आणि आलिया भट्टला सुद्धा साईन केले आहे. एका पोर्टलच्या रिपोर्टनुसार करणच्या सिनेमात रणवीर करिनाच्या अपोझिट दिसणार आहे.    
रणवीर आणि करिना कपूर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. दोघांनी आजपर्यंत एकाही सिनेमा एकत्र काम केलेले नाही. त्यामुळे प्रेक्षकांना ही फ्रेश जोडी पाहायला मिळेल. आता यात दुसरा हिरो कोण आहे हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरा अभिनेता यात रणवीर सिंगच्या लहान भावाची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेला नेगेटिव्ह शेड असणार आहेत. वरुण धवनचे नाव या भूमिकेसाठी चर्चेत आहे.    


करण जोहरचा हा सिनेमा एक पीरियड लव्ह स्टोरी असणार आहे. या सिनेमाची शूटिंग पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये सुरु होणार आहे. अजूनपर्यंत या सिनेमाची ऑफिशल अनाउंसमेंट झालेली नाही.  
रणवीरच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर रणवीर व दीपिका सध्या फ्लोरिडामध्ये आहेत आणि या देशाच्या रस्त्यांवर एकमेकांच्या हातात हात गुंफून फिरत होते. लवकरच दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Ranveer singh will seen opposite to kareena kapoor in karan johars upcoming movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.