ठळक मुद्देबॉलिवूडमध्ये राखी सावंत रॉकस्टार - रणवीर सिंग

बॉलिवूडचा गली बॉय म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग नेहमी आपल्या स्टाईल स्टेंटमेंटमुळे चर्चेत असतो. त्याची स्टाईल स्टेटमेंट नेहमीच हटके असते. त्यामुळे नेहमी तो चर्चेत असतो. आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने बॉलिवूडमध्ये राखी सावंत रॉकस्टार असल्याचे सांगितले आणि इतकेच नाही तर राखी सावंत खूप आवडत असल्याचे सांगितले. त्याचे हे विधान ऐकल्यानंतर त्याचे चाहते हैराण झाले आहेत. 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणवीरला एका मुलाखतीत विचारले की, इंडस्ट्रीमध्ये तू कोणाला रॉकस्टार मानतो? या प्रश्नाचे उत्तर देताना रणवीर म्हणाला की, राखी सावंतला मी रॉकस्टार मानतो आणि मला ती खूप आवडते.


याच मुलाखतीत रणवीर सिंगने सांगितले की पत्नी दीपिका पादुकोणसोबतच त्याची बहिण रितिका भवनानीच्या देखील जास्त जवळ असल्याचे सांगितले. मी स्वतःला खूप चांगले ओळखतो तेवढे कुणीच ओळखत नाही. 


रणवीर सिंग आपल्या ड्रेसिंग सेंसमुळे नेहमी चर्चेत असतो. तो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतो. त्यात तो हटके ड्रेसमध्ये पाहायला मिळतो. 


रणवीर सिंगचा गली बॉय चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात त्याने रॅपरची भूमिका केली आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.


Web Title: Ranveer Singh will be reading this rumor to Rakhi Sawant, will read Haran
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.