OMG रणवीर सिंगवर चोरीचा आरोप! WWE रेसलरच्या वकीलाने घेतली शाळा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 10:19 AM2019-06-20T10:19:24+5:302019-06-20T10:29:24+5:30

एक फोटो शेअर करणे रणवीरला चांगलेच महागात पडले. हा फोटो होतो, हार्दिक पांड्यासोबतचा.

ranveer singh threatened on twitter by brock lesnar lawyer paul heyman | OMG रणवीर सिंगवर चोरीचा आरोप! WWE रेसलरच्या वकीलाने घेतली शाळा!!

OMG रणवीर सिंगवर चोरीचा आरोप! WWE रेसलरच्या वकीलाने घेतली शाळा!!

googlenewsNext
ठळक मुद्दे आता पॉल खरोखरच रागात बोलला की तो रणवीरची मस्करी करत होता, हे माहित नाही. पण अद्याप रणवीरने त्याच्या या  ट्वीटचे उत्तर दिलेले नाही.

अभिनेता रणवीर सिंग नुकताच भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान टीम इंडियाला चीअर करताना दिसला. त्याने केवळ भारतीय टीमला चीअर केले नाही तर कॉमेंट्रीही केली. अनेक क्रिकेट खेळाडूंसोबत व्हिडिओ आणि सेल्फी घेत धम्माल केली. हे सगळेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. रणवीरनेही यादरम्यानचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले. पण एक फोटो शेअर करणे रणवीरला चांगलेच महागात पडले. हा फोटो होतो, हार्दिक पांड्यासोबतचा. या फोटोला त्याने, Eat. Sleep. Dominate. Repeat. The name is Hardik. Hardik Pandya असे कॅप्शन दिले होते.




 पॉल हेमैनची नजर या फोटोवर पडली आणि तो भलताच नाराज झाला. मग काय, त्याने रणवीरला चांगलेच सुनावले. केवळ  सुनावलेच नाही तर त्याने रणवीरवर चोरीचा आरोपही केला. आता हा पॉल हेमैन कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तो डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार ब्रॉक लेसनरचा वकील आहे. पॉल हेमैन अनेकदा ब्रॉकसोबत दिसतो. पॉलने रणवीरचे  ट्वीट रिट्वीट करत, त्याची चांगलीच शाळा घेतली.


‘ARE YOU F'N KIDDING ME???????????
1 - It's Eat Sleep CONQUER Repeat
2 - Copyright  
3 - I am litigious
4 - EAT SLEEP DEPOSITION REPEAT  ’ असे  ट्वीट त्याने केले. आता पॉलच्या या  ट्वीटनंतरही तुम्हाला काहीही बोध झाला नसेल तर पुढची बातमी तुम्ही वाचायलाच हवी. त्याचे असे आहे की, हे वाक्य ब्रॉक लेसनरच्या रिंगमधील एण्ट्रीला वापरले जाते.  पॉलच्या  ट्वीटचा अर्थ काढायचा झाल्यास कदाचित ब्रॉकच्या या वाक्यावर त्याचे कॉपीराइट आहे.   पॉलच्या मते, रणवीरने जाणीवपूर्वक या डायलॉगचा वापर केला आहे.
 आता पॉल खरोखरच रागात बोलला की तो रणवीरची मस्करी करत होता, हे माहित नाही. पण अद्याप रणवीरने त्याच्या या  ट्वीटचे उत्तर दिलेले नाही. आता रणवीर या ट्वीटवर काय उत्तर देतो ते बघूच.
 
 

Web Title: ranveer singh threatened on twitter by brock lesnar lawyer paul heyman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.