Ranveer Singh increased the Padma Vast Yash "Cash"! | ​‘पद्मावत’चे यश ‘कॅश’ करत रणवीर सिंगने वाढवली फी!

एक क्षण असाही होता की, रणवीर सिंग ‘पद्मावत’मधील अलाऊद्दीन खिल्जीची निगेटीव्ह भूमिका साकारावी की नाही, या संभ्रमात होता. अनेकांनी त्याला ही भूमिका न स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. तू ही भूमिका स्वीकारलीच तर तुझे करिअर धोक्यात येऊ शकते, असे अनेकांनी त्याला बजावले होते. पण रणवीरने ही भूमिका आव्हान म्हणून स्वीकारली आणि पुढे याच भूमिकेने रणवीरला प्रचंड कौतुकही मिळवून दिले. ‘पद्मावत’ रिलीज झाल्यावर जो तो रणवीरचे कौतुक करतोय. दीपिका पादुकोणपेक्षाही रणवीरच्या अभिनयाची प्रशंसा होतेय. आता ही प्रशंसा ‘कॅश’ तर करायलाच हवी. म्हणूनच रणवीरने त्याची फी वाढवली आहे.
होय, ताज्या बातमीनुसार, ‘पद्मावत’नंतर रणवीरने त्याच्या फीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. यापुढे रणवीर आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी १३ कोटी रूपये घेईल, असे कळतेय.

ALSO READ : SEE PIC : ​रणवीर सिंगला पाहून तुम्हीही म्हणाल, कुठे तो ‘खिल्जी’ अन् कुठे हा ‘गली बॉय’?

खरे तर ‘पद्मावत’साठी दीपिकाला रणवीर सिंग व शाहिद कपूरपेक्षा अधिक फी मिळाली होती. दीपिकाने स्वत:  याचा खुलासा केला होता. पण ‘पद्मावत’नंतर दीपिकाची फी ‘जैसे थे’ आहे. याऊलट रणवीर मात्र ‘महाग’ झालाय. अर्थात रणवीर किती हाडाचा अभिनेता आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे आणि आपल्या भूमिकेत जीव ओतण्यासाठी रणवीर काय काय करतो, याचीही सर्वांना कल्पना आहे.  त्यामुळेच त्याने स्वत:ची फी वाढवली असेल तर त्याचे समर्थन करणारेच अधिक आहे.
तूर्तास रणवीर ‘गली बॉय’ या चित्रपटात दिसणार आहे.   सध्या या  चित्रपटाचे शूटींग धडाक्यात सुरु आहे.  जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो अलीकडे लिक झाले  होते. रणवीरचे या चित्रपटातील लूक त्याच्या ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील लूकशी बरेच मिळते जुळते आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट एका तरूण मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटातही रणवीरची वर्णी लागली आहे.
Web Title: Ranveer Singh increased the Padma Vast Yash "Cash"!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.