Ranveer Singh finally gets heroin! Sara Ali Khan's song in 'Simba' !! | It's final: ​अखेर रणवीर सिंगला मिळाली हिरोईन! ‘सिम्बा’मध्ये सारा अली खानची वर्णी!!
It's final: ​अखेर रणवीर सिंगला मिळाली हिरोईन! ‘सिम्बा’मध्ये सारा अली खानची वर्णी!!
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित  ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटासाठी अखेर हिरोईन मिळालीयं. होय, या चित्रपटासाठी रोहित व करणने सैफ अली खान आणि अमृता सिंगची लाडकी लेक सारा अली खान हिला फायनल केले आहे.  धर्मा प्रॉडक्शनने आज याबाबतची अधिकृत घोषणा केली. ‘एक सुंदर नवा चेहरा + एका सुपरस्टारची अल्टिमेट एनर्जी + दोन सर्वांत मोठ्या मेकर्सची जादू = ब्लॉकबस्टर सिम्बा’, या कॅप्शनसह साराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता या चित्रपटात सारा व रणवीर सिंहची फ्रेश जोडी आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल.गेल्या अनेक दिवसांपासून ‘सिम्बा’साठी हिरोईनचा शोध सुरू  होता. यादरम्यान अनेक अभिनेत्रींच्या नावांची चर्चा झाली. सर्वप्रथम जान्हवी कपूरने ‘सिम्बा’ साईन केल्याची बातमी आली. नंतर इंटरनेट सेन्सेशन व मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर या चित्रपटात दिसणार, अशी चर्चा रंगली. पण आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण आता या चित्रपटात साराची वर्णी लागली आहे.

ALSO READ : ​‘केदारनाथ’ रखडल्याने सैरभैर झाली सारा अली खान! आता ‘सिम्बा’चा आधार!!

 खरे तर करणला या चित्रपटात साराचं हवी होती. पण  पहिल्या वहिल्या ‘केदारनाथ’ या चित्रपटात व्यस्त असल्याने साराने करणच्या या चित्रपटाला नकार दिला होता. कारण त्यावेळी सारा केवळ ‘केदारनाथ’वर फोकस करू इच्छित होती. पण गेल्या काही दिवसांतचं ‘केदारनाथ’ रखडला आणि पुढे रखडतचं गेला. कदाचित यामुळे संधीचे सोने करण्याच्या इराद्याने साराने करणला होकार देणेचं योग्य समजले. आता सारा ‘केदारनाथ’द्वारे डेब्यू करते की, ‘सिम्बा’ हा साराचा डेब्यू सिनेमा ठरतो, ते येत्या काळात कळेलच. तोपर्यंत अर्थातचं प्रतीक्षा...!
‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग ‘टेंपर’मधून घेतला जाईल. उर्वरित चित्रपट बॉलिवूड प्रेक्षकांना डोळ्यांपुढे ठेवून बनवला जाईल.

Web Title: Ranveer Singh finally gets heroin! Sara Ali Khan's song in 'Simba' !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.