Ranveer Singh, Deepika Padukone's relationship with bitterness, see video! | रणवीर सिंग, दीपिका पादुकोणच्या नात्यात आला कडवटपणा, पहा व्हिडीओ!

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बॉलिवूडमधील सर्वाधिक सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. गेल्या काही काळापासून हे दोघे एकमेकांना डेट करीत आहेत. यादरम्यान दोघांनीही बरेचसे चढ-उतार बघितले, मात्र अशातही दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. विशेष म्हणजे या दोघांनी पब्लिकसमोर आपल्या प्रेमाची कबुली देण्यासही कधी माघार घेतली नाही. बिंधास्तपणे यांनी शक्य होईल तेव्हा त्यांच्यातील प्रेम दाखवून दिले. त्यामुळे अशादेखील बातम्या समोर आल्या होत्या की, हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र दीपिकाच्या एका वक्तव्यामुळे हे आता अशक्य असल्याचे दिसत आहे. होय, दीपिकाने असे काही वक्तव्य केले, ज्यामुळे या दोघांच्या नात्यात कडवटपणा आला असावा, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. 

प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या बायोग्राफी बुकच्या लॉन्चिंगप्रसंगी दीपिकाने म्हटले होते की, अशा व्यक्तीला शोधणे खूपच अवघड आहे, जो तुमचे यश आणि पॅशन समजून घेईल. दीपिकाने म्हटले होते की, ‘रोमॅण्टिक नात्याविषयी बोलायचे झाल्यास ते खूपच कॉम्पलीकेटेड असतात. कारण अशा व्यक्तीचा शोध घेणे खूपच अवघड असते, जो तुमचे यश आणि पॅशन समजून घेईल. दीपिकाने पुढे बोलताना म्हटले होते की, ‘बरेचसे लोक त्यांचे यश सांभाळू शकत नसल्याने ते आपल्यापासून दूर होत जातात. यामुळे मी नाराज होते असे नाही, कारण आयुष्य अशाच पद्धतीने पुढे जात असते. जे लोक तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात, ते तुम्हाला समजून घेतात.’ दीपिकाचे हे वक्तव्य बरेच काही सांगणारे असून, तिच्या बोलण्यावरून रणवीर आणि तिच्या नात्यात दुरावा तर आला नाही ना? असा प्रश्न उपस्थित करणे साहजिक आहे. 

मित्रानो, खरं तर दीपिका आणि रणवीर एकमेकांच्या खूप क्लोज आहेत. परंतु दीपिकाचे हे वक्तव्य रणवीरवर निशाणा साधणारे तर नाही ना? असो, एक गोष्ट मात्र नक्कीच म्हणावी लागेल ती म्हणजे रणवीर आणि दीपिकामध्ये सर्व काही आलबेल नाही. आता रणवीर यावर प्रतिक्रिया देणार की हे प्रकरण इथेच मिटविणार हे बघणे मजेशीर ठरेल. 
Web Title: Ranveer Singh, Deepika Padukone's relationship with bitterness, see video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.