ranveer singh and alia bhatt film gully boy trailer these funny memes |  ‘गली बॉय’चा ट्रेलर अन् रणवीर सिंग व आलिया भट्टवरचे धम्माल मीम्स !!
 ‘गली बॉय’चा ट्रेलर अन् रणवीर सिंग व आलिया भट्टवरचे धम्माल मीम्स !!

ठळक मुद्देया चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रणवीर व आलियाची जोडी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.येत्या १४ फेबु्रवारीला म्हणजेचं व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. 

रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘गली बॉय’चा ट्रेलर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर हिटही झाला. रिलीजनंतर काही तासांतच ‘गली बॉय’चा ट्रेलर ट्रेंड होऊ लागला. सोबतच ट्रेलरवरचे मीम्सही व्हायरल झालेत. होय, रणवीर व आलियाच्या या चित्रपटाच्या ट्रेलरवर काही युजर्सनी मजेशीर मीम्स तयार केलेत.
विशेषत: रणवीरच्या तोंडचा ‘अपना टाईम आएगा’ आणि आलियाच्या तोंडचा ‘तू मर जाएगा’ हे दोन डायलॉग्स प्रचंड वेगाने व्हायरल झालेत. मग काय, या डायलॉग्सवर एका पाठोपाठ एक असे भन्नाट मीम्सही तयार झालेत. हे मीम्स इंटरनेटवर वा-याच्या वेगाने पसरलेत. हे धम्माल मीम्स तुम्हीही पाहा आणि पोट धरून हसा...


‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रणवीर व आलियाची जोडी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.येत्या १४ फेबु्रवारीला म्हणजेचं व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.  

 

English summary :
Ranveer Singh and Alia Bhatt's starrer 'Gully Boy' trailer was released and hit on social media. Many memes created based on this trailer. Must check some of this memes.


Web Title: ranveer singh and alia bhatt film gully boy trailer these funny memes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.