म्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 04:44 PM2018-12-15T16:44:47+5:302018-12-15T16:52:15+5:30

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर हनीमूनला न जाता रणवीर सिंग कामावर परतला आहे.

Ranveer sing reveals what made his fall in love with Deepika padukone | म्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली

म्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली

googlenewsNext
ठळक मुद्दे'गोलिंयो की रासलीला रामलीला' सिनेमाच्या सेटवर दोघांचे प्रेम फुललेलवकरच रणवीरचा सिम्बा सिनेमा रिलीज होणार आहे.

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर हनीमूनला न जाता रणवीर सिंग कामावर परतला आहे. सध्या तो सगळीकडे त्याचा आगामी सिनेमा 'सिम्बा'च्या प्रमोशनसाठी फिरतो आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणवीर एका रिअॅलिटी शोमध्ये आला होता. यावेळी त्यांने दीपिकाबाबतच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.       


रणवीर आणि दीपिकाने पहिल्यांदा संजय लीला भन्साळींच्या 'गोलिंयो की रासलीला रामलीला' सिनेमा एकत्र काम केले. यात सिनेमात दोघांची मुख्य भूमिका होती. याच सिनेमाच्या सेटवर दोघांचे प्रेम फुलले. 


रणवीरने सांगितले, ''या सिनेमातील एक गाण्यावर नाचताना पाहिले आणि त्याचक्षणी तो तिच्याप्रेमात पडला.''  यासिनेमानंतर या कपलच्या लव्हलाईफ चर्चेत आली. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते. त्यानंतर त्या दोघांनी बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केले.


 रणवीर सिंगच्या सिनेमांबाबत बोलायचे झाले तर 'सिम्बा'मध्ये त्याच्यासोबत सारा अली खान दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे. ‘सिम्बा’हा सिनेमा साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘सिम्बा’या सिनेमात रणवीरपहिल्यांदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या सिनेमात भरपूर अॅक्शन आणि कॉमेडी करताना दिसणार आहे. येत्या २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   

Web Title: Ranveer sing reveals what made his fall in love with Deepika padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.