मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 08:05 PM2019-01-16T20:05:31+5:302019-01-16T20:14:36+5:30

दीपवीर लग्नानंतर देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. लग्नानंतर दोन महिने उलटून गेले तरी ते कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात.

ranveer changing his surname with deepika surname? | मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ?

मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ?

googlenewsNext
ठळक मुद्देदीपिकाच्या प्रेमात अकांठ बुडालेल्या रणवीरने दीपिकासाठी नाव बदलण्याची देखील तयारी दर्शवली आहेदीपिकाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले

दीपवीर लग्नानंतर देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. लग्नानंतर दोन महिने उलटून गेले तरी ते कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. लग्नानंतर दीपिकाने दिलेल्या पहिल्या मुलाखतीत तिला, लग्नानंतर तुला दीपिका पादुकोण असेच म्हणायचे की, दीपिका पादुकोण सिंग भवनानी, अशी तुझी ओळख करून द्यायची? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर दीपिकाने मोठे मजेशीर उत्तर दिले. मी आहे, दीपिका पादुकोण, वाईफ आॅफ रणवीर सिंग पादुकोण, असे दीपिका म्हणाली. दीपिकाच्या या उत्तरावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाच्या प्रेमात अकांठ बुडालेल्या रणवीरने दीपिकासाठी नाव बदलण्याची देखील तयारी दर्शवली आहे. 


रणवीर म्हणाला, ''मी माझं आडनाव कधीच वापरत नाही तर दीपिकाचं आडनाव लावायला मला काहीच हरकत नाही.'' असे मजेशीर उत्तर त्याने दिले. त्यामुळे दीपिकावरील प्रेमासाठी रणवीर सिंग काहीही करायला तयार असल्याचे दिसतंय. 


दीपिका पादुकोणच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर दीपिकाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले असून लक्ष्मी अग्रवालवरील बायोपिक 'छपाक' सिनेमा तयार करणार आहे. दीपिकाने सिनेमातील निगडीत व्यक्तींसोबत बैठक केली व या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रोस्थेटिक मेकअपची करण्याची गरज आहे की नाही, यावर सल्ले घेतले.  'छपाक' चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: ranveer changing his surname with deepika surname?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.