Ranbir Singh-Aliya Bhatt's acting role in the role of actress! | रणबीर सिंग -आलिया भट्टच्या चित्रपट ही अभिनेत्री साकारणारी नेगेटिव्ह भूमिका !

टीव्ही वरील नागिन लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. गोल्ड चित्रपटात अक्षय कुमारच्या अपोझिट ती दिसणार आहे. आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते की यानंतर ती  रणबीर कपूर आणि आलियासोबत दिसणार आहे. या चित्रपटात मौनी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार मौनी अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर आणि आलियासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ती यात रणबीरच्या रस्त्यात अडचणी टाकण्याचे काम करणार आहे. यात रणबीरच्या गर्लफ्रेंडची भूमिका आलिया भट्ट साकारणार आहे. 

या चित्रपटात रणबीर आलियाशिवाय बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहेत. पहिल्यांदाच रणबीर आणि आलिया एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटासाठी रणबीरने घोडेस्वारी आणि जिम्नॅस्टिकची ट्रेनिंगसुद्धा घेतले  आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'ड्रॅगन' असे ठरवण्यात आले होते. अयान मुखर्जी अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होता. ज्यात एक सुपरहिरो आहे आणि त्याच्याकडे अद्नभुत शक्ति आहेत. या कथेला अनुसरून करण जोहरने या चित्रपटाचे नाव 'ब्रह्मास्त्र' असे ठेवले आहे. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करतो आहे. 

ALSO READ :   मोहित रैनाने त्याच्या आणि मॉनी रॉयच्या नात्याबद्दल केला हा खुलासा

ब्रह्मास्त्र आधी मौनीचा गोल्ड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोल्ड चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा कागती करते आहे.  हा चित्रपट  भारताने लंडनमध्ये 1948साली ऑलिम्पिंकमध्ये जिंकलेल्या पहिल्या गोल्ड मेडलवर आधारित आहे.  हा चित्रपट 15 ऑगस्ट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे. लंडनमध्ये या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग करण्यात आले आहे. 

Web Title: Ranbir Singh-Aliya Bhatt's acting role in the role of actress!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.