Ranbir Kapoor's 'Sanju' releases before the release! Complain against 'that' scene in the sensor board !! | रणबीर कपूरचा ‘संजू’ रिलीजआधीचं वादात! ‘त्या’ दृश्याविरोधात सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार!!

 यंदाचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘संजू’ रिलीजआधी वादात सापडला आहे. होय़ यातील एका दृश्याने वाद निर्माण केला आहे. पृथ्वी म्हस्के नामक कार्यकर्त्याने ‘संजू’तील संबंधित दृश्यावर आक्षेप नोंदवत सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार केली आहे. ‘संजू’चा ट्रेलर अलीकडे रिलीज झाला. यात एक सीन दाखवला गेला होता.संजय दत्त साकारत असलेला रणबीर कपूर तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याच्या बराकीतील टॉयलेट ओव्हरफ्लो होतो आणि संजू येथून बाहेर पडण्यासाठी धडपडतो, असे एक दृ्श्य यात होते.ट्रेलरमधील नेमक्या याच दृश्यावर पृथ्वी यांनी आक्षेप घेतला आहे. हे दृश्य पाहता ‘संजू’मध्ये भारतीय तुरुंगाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. सरकार आणि तुरुंग प्रशासन प्रत्येक बराकीची काळजी घेते. बराकीतील टॉयलेट ओव्हरफ्लो होण्याची गोष्ट कधीही ऐकवात नाही. तेव्हा असे दृश्य् भारतीय तुरुंगाची प्रतीमा मलिन करणारे आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सेन्सॉर बोर्डाने या तक्रारीची दखल घेतली नाही तर आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
तुम्हाला ठाऊक असेलचं की, ‘संजू’ हा चित्रपट संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित आहे. या रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. ‘संजू’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रत्येकांच्या ओठांवर रणबीर कपूरचे नाव आहे. या चित्रपटातील रणबीरच्या अभिनयाची मुक्तकंठाने प्रशंसा होतेय. हा चित्रपट सुपरडुपर हिट असणार, इथपर्यंत भाकित वर्तवले जात आहे. अभिनेता संजय दत्त यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा पाचवा चित्रपट आहे. मजेशीर बाब म्हणजे, यापैकी तीन चित्रपटांत खुद्द संजय दत्तने काम केले आहे आणि आता पाचवा चित्रपट संजयच्याच आयुष्यावर बेतलेला आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.  

WATCH TRAILER : मैं बेवड़ा हूं, ठरकी हूं... लेकिन टेररिस्ट नहीं! ‘संजू’चा बहुप्रतिक्षीत ट्रेलर रिलीज, पाहून व्हाल खल्लास!!

ट्रेलरमध्ये संजय आयुष्यातील काही गोड क्षण आहेत, तसेच त्याच्या वाट्याला आलेले काही दाहक अनुभवही आहेत. ट्रेलरमधील दोन सीन्स तर अंगावर रोमांच उभे करणारे आहेत. यापैकी एक सीन आहे, तुरुंगातला. तुरुंगाचे शौचालय ओव्हर फ्लो होतेय आणि संजयच्या भूमिकेतील रणबीर जोरजोराने तेथून बाहेर काढण्यासाठी ओरडतो आहे. अन्य एका सीनमध्ये रणबीर न्यूड उभा  आहे आणि पोलिस त्याला स्कॅन करताहेत.
Web Title: Ranbir Kapoor's 'Sanju' releases before the release! Complain against 'that' scene in the sensor board !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.