Ranbir Kapoor's name is in Hrithik Roshan and Kangana Ranaut's fight? | ​हृतिक रोशन अन् कंगना राणौतच्या भांडणात का आले रणबीर कपूरचे नाव?

हृतिक रोशन आणि कंगना राणौत यांची ‘अजब पे्रम की गजब कहानी’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हृतिकने कंगनाविरोधात केलेल्या तक्रारीची प्रत काल-परवा सार्वजनिक झाली आणि यानिमित्ताने हा वाद पुन्हा ताजा झाला. कंगना मला सेक्शुअल ई-मेल पाठवायची, असा आरोप हृतिकने आपल्या या तक्रारीत केला आहे. हृतिकच्या या तक्रारीत बॉलिवूडच्या दोन सुपरस्टार्सच्या नावांचा उल्लेखही केलेला दिसतोय. होय, आमिर खान आणि रणबीर कपूर या दोघांचा उल्लेख हृतिकने कंगनाविरोधात केलेल्या तक्रारीत आहे. त्यामुळे हृतिक व कंगनाच्या भांडणाचे आणि आमिर व रणबीरचा काय संबंध असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.‘रिपब्लिक टीव्ही’ने हृतिकने कंगनाविरोधात केलेल्या तक्रारीची प्रत जगजाहिर केली. यानंतर ‘पिंकविला’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, हृतिकने आपल्या तक्रारीत आमिर व रणबीरच्या नावाचा उल्लेख केला आहे. कंगना मला  आमिर खान व रणबीर कपूरच्या नावावरून खिजवायची, डिवचायची. त्यांचे नाव घेऊन मला कमी लेखायची, असे हृतिकने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आता यात किती तथ्य आहे, ते कंगना व हृतिक या दोघांनाच ठाऊक पण कंगना व रणबीर हा अँगल नवा नाही, हे मात्र तेवढेच खरे.ALSO READ:  कंगना राणौतची बहीण रंगोलीचा चढला पारा! हृतिक रोशलला म्हणाली, ‘अंकल, कंगनाला विसर’!!

रणबीर कपूरवरून कंगना आणि कॅटरिना कैफ यांच्यात कोल्डवॉर सुरु असल्याच्या बातम्या मध्यंतरी चर्चेत होत्या. २०१४ मध्येही अशीच एक बातमी आली होती. कंगनाने आपले काही फोटो रणबीरला पाठवल्यावरून कॅटरिना संतापली होती, अशीही चर्चा होती. (त्यावेळी रणबीर व कॅटरिना दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. ) अर्थात कॅटरिनाने या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले होते. मी एका पार्टीत केवळ एकदाच कंगनाला भेटलेयं. ती गोड मुलगी आहे. अशा बातम्या कुठून येतात मला ठाऊक नाही, असे कॅटरिना म्हणाली होती.
यानंतर २०१६ मध्ये पुन्हा एकदा कंगना व रणबीर यांच्या लिंकअपच्या अफवा उठल्या होत्या. कंगना व रणबीर आक्षेपार्ह अवस्थेत सापडले, अशी बातमी त्यावेळी व्हायरल झाली होती. रणबीरने या बातम्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पण आता पुन्हा एकदा कंगनामुळे रणबीर चर्चेत आला आहे.
Web Title: Ranbir Kapoor's name is in Hrithik Roshan and Kangana Ranaut's fight?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.