ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर...वाचा सविस्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 03:46 PM2018-11-26T15:46:10+5:302018-11-26T15:48:18+5:30

ऋषी कपूर - नीतू कपूरची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा तशी लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. पण बॉलिवूड इंडस्ट्रीत डिजाईनिंग क्षेत्रात तिचे नाव कायम चर्चेत असते. पण आता रिद्धिमा एका चुकीच्या कारणासाठी चर्चेत आहे.

ranbir kapoor sister riddhima accused of copying designs famous brand | ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर...वाचा सविस्तर!!

ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर...वाचा सविस्तर!!

googlenewsNext
ठळक मुद्देरिद्धिमाचे R नामक ज्वेलरी कलेक्शन आहे. तिचे डिझाईन सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये लोकप्रीय आहेत.

ऋषी कपूर - नीतू कपूरची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा तशी लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. पण बॉलिवूड इंडस्ट्रीत डिजाईनिंग क्षेत्रात तिचे नाव कायम चर्चेत असते. पण आता रिद्धिमा एका चुकीच्या कारणासाठी चर्चेत आहे. होय, रिद्धिमावर एका डिजाईनची नक्कल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
होय, अलीकडे रिद्धिमा कपूर साहनीने फेस्टिवल ज्वेलरी कलेक्शन जारी केले होते. या कलेक्शनमध्ये डायमंड आणि पर्लने बनलेल्या ईअररिंग्सचा समावेश आहे. यातील एका ईअररिंगचे डिझाईन रिद्धिमाने आपल्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केले होते. पण तिचे हे पे्रजेंटेशन चोरीचे असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. हे ईअररिंग Kokichi Mikimoto ची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे.

‘डाईट सब्या’ नामक इन्टाग्राम अकाऊंटवरून रिद्धिमावर नक्कल केल्याचा आरोप केला गेला आहे. डाईट सब्याने आपल्या अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एकात ओरिजनल ईअररिंग आहेत आणि दुसºया फोटोत रिद्धिमाची पोस्ट आहे. Kokichi Mikimoto ला जगात ‘पर्ल किंग’ नावाने ओळखले जाते. १९१६ पासून काम करत असलेले हे ब्रँड एक बेंचमार्क आहे, असेही डाईट सब्याने म्हटले आहे. रिद्धिमाचे R नामक ज्वेलरी कलेक्शन आहे. तिचे डिझाईन सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये लोकप्रीय आहेत.
अलीकडे रिद्धिमा भाऊ रणबीर कपूर व आलियाच्या रिलेशनशिपवर बोलली होती. चर्चा तर सुरू आहे, त्यांनाच विचारा. मी यावर आणखी काय बोलू. माझा भाऊ रिलेशनशिपमध्ये असेल तर मला आनंदचं आहे. मी एक आनंदी बहीण आहे, असे रिद्धिमा म्हणाली होती.

Web Title: ranbir kapoor sister riddhima accused of copying designs famous brand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.