Ranbir Kapoor responded by talking negative about Paki actress Mahira Khan | पाकी अभिनेत्री माहिरा खानबद्दल नकारात्मक बोलणाऱ्यांना रणबीर कपूरने दिले उत्तर!

गेल्या दोन दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान चर्चेत आहेत. या दोघांचे स्मोकिंग करतानाचे काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने, दोघांची भेट नेमकी कुठे, कशी आणि का झाली? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे, तर दुसरीकडे माहिरा खानवर पाकी प्रेक्षकांकडून आग ओकली जात असून, तिला पाकिस्तानातही पायही ठेवू देऊ नका अशाप्रकारचा संताप व्यक्त केला जात आहे. माहिराबद्दल पाकी जनतेचा होत असलेला उद्रेक बघून रणबीर कपूर चांगलाच चवताळला असून, त्याने या संपूर्ण प्रकरणावर एक मोठे वक्तव्य केले आहे. 

होय, एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने म्हटले की, ‘गेल्या काही काळापासून मी माहिराला ओळखतो. मी तिचा खूप आदर करतो. त्यामुळे तिला ज्या पद्धतीने जज केले जात आहे, ते पूर्णत: चुकीचे आहे. त्यापेक्षाही दु:खद बाब ही एक की, तिच्यावर यामुळे निशाणा साधला जात आहे की, ती एक महिला आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, कृपा करून नकारात्मकता पसरवू नका आणि देवाने दिलेले सुंदर आयुष्य एन्जॉय करा. नकारात्मकता आणि स्मोकिंग दोन्ही आरोग्यासाठी खूपच हानीकारक आहे. रणबीरचे हे वक्तव्य त्या लोकांसाठी होते, जे माहिराविषयी चुकीचे बोलत आहेत. रणबीरच्या या वक्तव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, माहिरावर लोकांकडून केले जात असलेले आरोप चुकीचे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून माहिरा आणि रणबीर सातत्याने चर्चेत आहेत. एक तर हे दोघे स्मोकिंग करीत आहेत अन् दुसरी बाब म्हणजे माहिरा बॅकलेस शॉर्ट ड्रेसमध्ये आहे. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर माहिराच्या या फोटोमुळे पाकिस्तानातही खळबळ उडाली आहे. आता रणबीरच्या या वक्तव्यानंतर लोकांचा राग शांत होणार काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 
Web Title: Ranbir Kapoor responded by talking negative about Paki actress Mahira Khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.