रणबीर कपूरचे या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे नाव, यातील काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 06:05 PM2018-07-17T18:05:15+5:302018-07-17T18:06:17+5:30

संजय दत्त प्रमाणेच संजू या चित्रपटात संजयची भूमिका साकारणाऱ्या रणबीरचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. रणबीर सध्या आलिया भट सोबत नात्यात आहे.

ranbir kapoor name was involved with this bollywood actress | रणबीर कपूरचे या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे नाव, यातील काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

रणबीर कपूरचे या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे नाव, यातील काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

googlenewsNext

संजू या चित्रपटात संजय दत्तच्या भूमिकेत आपल्याला रणबीर कपूरला पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. संजू या चित्रपटाच्या ट्रेलरमधून संजय दत्तच्या किती प्रेयसी होत्या हे आपल्याला कळले होते. संजय दत्त प्रमाणेच संजयची भूमिका साकारणाऱ्या रणबीरचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. रणबीर सध्या आलिया भट सोबत नात्यात आहे. पण या आधी अनेक अभिनेत्रींसोबत त्याच्या नात्याची चर्चा झाली होती.
सावरिया या चित्रपटाद्वारे रणबीरने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात सोनम कपूर त्याच्यासोबत झळकली होती. या चित्रपटाच्या वेळी ते दोघे नात्यात असल्याचे म्हटले जात होते. सोनम कपूर प्रमाणेच रणबीर आणि दीपिका पादुकोणच्या नात्याची देखील चर्चा झाली होती. बचना ए हसिनो या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान रणबीर आणि दीपिका एकमेकांच्या प्रेमात पडले. तिने रणबीरच्या नावाच्या आद्याक्षराचा टॅटूदेखील मानेवर गोंदवला होता. पण कतरिना कैफसोबत रणबीरची जवळीक वाढल्याने दीपिका आणि रणबीरचे ब्रेकअप झाले. 
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर अनेक महिने नात्यात होते. एवढेच नव्हे तर ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील असल्याचे म्हटले जात होते. पण त्या दोघांनी नेहमीच मीडियामध्ये त्यांच्या नात्याविषयी बोलणे टाळले. त्या दोघांना अनेक वेळा पार्टींमध्ये एकत्र पाहिले जात असे. पण अचानक त्यांनी ब्रेकअप केले. 
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत देखील रणबीरचे नाव जोडले गेले होते. त्या दोघांचा लंडनमध्ये फिरतानाचा एक फोटो देखील व्हायरल झाला होता. एवढेच नव्हे तर अमीषा पटेल सोबत देखील रणबीरचे अफेअर असल्याच्या बातम्या एकेकाळी मीडियात गाजल्या होत्या. अमीषा कपूर कुटुंबीयांसोबत अनेक पार्ट्यांमध्ये देखील दिसली होती. 
रणबीर कपूर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्याला अवंतिका मलिक खूप आवडत असल्याचे म्हटले जाते. केवळ तिची एक झलक पाहाण्यासाठी तो जस्ट मोहोब्बतच्या सेटवर जात असे. या मालिकेत अवंतिकाने काम केले होते. अवंतिका ही आता अभिनेता इम्रान खानची पत्नी आहे. 
 

Web Title: ranbir kapoor name was involved with this bollywood actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.