रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार होता हा लूक, जाणून घ्या यामागची इंटरेस्टिंग गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 10:38 AM2019-03-11T10:38:18+5:302019-03-11T10:50:23+5:30

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचा लोगो प्रदर्शित झाला आहे. यानंतर आता रणबीरचा या सिनेमातील पहिला लूक आऊट झाला आहे.

Ranbir kapoor fisrtlook from brahmastra is out read the details and watch the pic | रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार होता हा लूक, जाणून घ्या यामागची इंटरेस्टिंग गोष्ट

रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार होता हा लूक, जाणून घ्या यामागची इंटरेस्टिंग गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्दे रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत अयानने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’मधला लूक आऊट केला आहे

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचा लोगो प्रदर्शित झाला आहे. यानंतर आता रणबीरचा या सिनेमातील पहिला लूक आऊट झाला आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’मधला लूक आऊट केला आहे.  


हा फोटो शेअर करताना अयानने एक पोस्टदेखील लिहिली आहे. ''रणबीरच्या लूकमध्ये अनेक फेरबदल करण्यात आले.  हा रणबीरचा सिनेमातला सगळ्यात पहिला लूक होता जो फायनल झाला नाही. यात रणबीरचे केस फार मोठे आहेत. अयानने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, रणबीरचे नाव आधी यात रुमी होते. ज्यानंतर ते बदलून शिवा ठेवण्यात आले.     

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. (‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या.  )‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.  करिअरच्या सुरूवातीला रणबीरने रोमॅन्टिक चित्रपट केलेत. या चित्रपटाने त्याची  लव्हरबॉय  ही इमेज तयार केली. पण आता तो या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करतो आहे. कदाचित म्हणूनचं रणबीरने ‘ब्रह्मास्त्र’ सारखा चित्रपट साईन केला आहे.

Web Title: Ranbir kapoor fisrtlook from brahmastra is out read the details and watch the pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.