Ranbir Kapoor finally disclosed the relationship with Alia Bhatt! | रणबीर कपूरने अखेर आलिया भट्टसोबतच्या नात्याचा केला खुलासा!

अभिनेता रणबीर कपूर त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा व्यक्तिगत जीवनामुळेच अधिक चर्चेत असतो. सध्या त्याचे नाव चुलबुली गर्ल अभिनेत्री आलिया भट्टशी जोडले जात आहे. अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात आलिया आणि रणबीर पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करीत आहेत. सध्या या दोघांना बºयाचदा एकत्र बघावयास मिळत आहे. त्यावरून त्यांच्यातील रिलेशनशिपची चर्चा आणखीनच रंगताना दिसत आहे. दरम्यान, जीक्यूला दिलेल्या मुलाखतीत रणबीर सहजपणे आलियासोबतच्या रिलेशनशिपबद्दल बोलून गेला. यावेळी त्याने तिच्यासोबतच्या प्रेमप्रकरणाची एकप्रकारे कबुलीच दिली. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, तो आलियाला डेट करीत आहेस काय? त्यावर रणबीरने म्हटले की, ‘हे माझ्यासाठी पूर्णपणे नवीन असून, मला याविषयी काहीच बोलायचे नाही.’

आलिया भट्टसोबतच्या डेटिंग आणि बॉन्डिंगबद्दल रणबीरने म्हटले की, ‘हे सध्या खूपच नवनवीन आहे. त्यामुळे मला यावर फारचे बोलायचे नाही. यास (नात्याला) आणखी काहीकाळ हवा आहे. काहीतरी स्पेस हवी आहे. एक कलाकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आलिया खूपच चांगली आहे. जेव्हा मी तिचे काम बघतो, तिचा अभिनय बघतो किंवा तिच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल जाणून घेतो तेव्हा ती खूपच महत्त्वाकांक्षी असल्याचे मला दिसते. दोघांविषयी सांगायचे झाल्यास, आमच्यासाठी हे सर्व नवे आहे. त्यामुळे ते आणखी पुढे जायला हवे.’दरम्यान, या अगोदर एका मुलाखतीत रणबीरने आलियासोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते की, ‘होय, एक मुलगा म्हणून मला तिच्यावर क्रश आहे.’ विशेष म्हणजे आलियानेही रणबीर कपूरविषयी तिच्या मनात असलेल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे. दरम्यान, हे दोघे पहिल्यांदा ‘ब्रह्मास्त्र’मध्ये बघावयास मिळणार आहे. चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, मौनी रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. उपलब्ध माहितीनुसार, ब्रह्मास्त्र एक नव्हे तर तीन भागात प्रदर्शित होणार आहे. त्याचा पहिला भाग १५ आॅगस्ट २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Ranbir Kapoor finally disclosed the relationship with Alia Bhatt!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.