सलमान खानला टक्कर देण्यासाठी रणबीर कपूर आणि संजय दत्त सज्ज, ठरला ईदचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 03:49 PM2018-07-05T15:49:04+5:302018-07-05T15:51:43+5:30

सध्या रणबीर कपूरचे स्टार तेजीत आहेत. संजूच्या बायोपिकने आतापर्यंत 150 कोटींचा गल्ला जमावला आहे.

Ranbir Kapoor and Sanjay Dutt ready to compete with Salman Khan | सलमान खानला टक्कर देण्यासाठी रणबीर कपूर आणि संजय दत्त सज्ज, ठरला ईदचा मुहूर्त

सलमान खानला टक्कर देण्यासाठी रणबीर कपूर आणि संजय दत्त सज्ज, ठरला ईदचा मुहूर्त

googlenewsNext
ठळक मुद्दे'शमशेरा'मध्ये बेफिक्रे गर्ल वाणी कपूर रणबीर कपूरच्या अपोझिट दिसणार आहेआदित्य चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

रणबीर कपूर आणि संजय दत्त स्टारर बहुचर्चित 'शमशेरा'ची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट 31 जुलै 2020ला रिलीज होणार आहे. यशराज बॅनर अंतर्गत शमशेराचा टीजर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 2020च्या ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे त्यामुळे ट्रेड एनालिस्टच्यानुसार सलमान खानचा चित्रपट यादिवशी रिलीज होऊ शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये सलमान खान ईदच्या मुहूर्तावर आपल्या फॅनसाठी एकतर चित्रपट रिलीज करतो.   

शमशेरामध्ये बेफिक्रे गर्ल वाणी कपूर रणबीर कपूरच्या अपोझिट दिसणार आहे. वाणी कपूर आमच्या अॅक्शन आणि एडव्हेंचर चित्रपट शमशेरमध्ये एका वेगळ्या अंदाजात दिसण्यासाठी तयार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूर यात डाकूच्या भूमिकेत दिसू शकतो तर संजय दत्त विलनच्या भूमिकेत असेल.  

काही दिवसांपूर्वी संजय दत्तने मीडियासमोर एक वेगळाच खुलासा केला होता. मीडियाशी बोलताना संजय दत्त म्हणाला होता की, त्याच्या 37 वर्षांच्या करिअरमध्ये तो पहिल्यांदाच यशराज बॅनरसोबत काम करतोय. आजपर्यंत त्यांने कधीच यशराजसोबत काम केलेले नाही. तर रणबीर कपूर तब्बल नऊ वर्षानंतर यशराजसोबत काम करतोय. याआधी रॉकेट सिंह: सेल्समैन ऑफ द ईयर' या यशराजच्या चित्रपटात तो दिसला होता. 
 यशराज बॅनर अंतर्गत तयार होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा करणार आहे. या चित्रपटाची शूटिंग 2019च्या मीडपर्यंत पूर्ण होईल. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करणार आहे.    
 

Web Title: Ranbir Kapoor and Sanjay Dutt ready to compete with Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.