Ranbir Kapoor and Alia Bhatt's name changed for Ranbir Kapoor? | रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या चित्रपटाचे बदललेले नाव रणबीरसाठी लकी ठरणार का ?

रणबीर कपूरचा जग्गा जासूस बॉक्स ऑफिसवर फ्लॉप जरी ठरला  तरी रणबीरकडे चित्रपटांची कमी नाही. सध्या रणबीर त्याच्या आगामी चित्रपट ड्रगनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. धर्मा प्रॉडकशन निर्मित या चित्रपटाचे नाव ड्रगन असे होते पण या चित्रपटाच्या मेकर्सनी त्याचे नाव बदलायाचे ठरविले आहे. डीएनएला मिळालेल्या माहितीनुसार  या चित्रपटाचे नाव ब्रह्मस्त्र असे ठेवण्यात येणार आहे.  ब्रह्मस्त्र हा एक संस्कृत शब्द आहे त्याच्या अर्थ ब्रम्हाचे एक अस्त्र जे कधीच चुकत नाही. शेवटी दिग्दर्शक आयान मुखर्जीला आपल्या चित्रपटासाठी एक चांगले  नाव शोधून काढलेच. हा बिग बजेट चित्रपट सुपरहिरोवर आधारित आहे. पण इंडिया टुडेच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाचे बजेट आता कमी करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की रणबीर कपूरच्या गेल्या काही चित्रपटांचे अनुभव बघता निर्मात्यांनी या चित्रपटाचा बजेट कमी केले आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. तसा ही रणबीरला एक हिट चित्रपटाची गरज आहे. तो या चित्रपटासाठी मेहनत घेत आहे.  काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याचा फोटो खुपच व्हायरल झाला त्यात त्याने सुपरहिरोसाठी आपल्या बॉडीवर काम केल्याचे दिसून आले होते. ह्यात हे दिसून आले की रणबीर या चित्रपटासाठी कसून मेहनत करत आहे. यात रणबीरसोबत आलिया भट्ट सुद्धा दिसणार आहे. आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

ALSO RAED :  ​‘दत्त’ नाही तर ‘हे’ असेल संजय दत्तच्या बायोपिकचे नाव!

सध्या रणबीर त्याच्या येणाऱ्या संजय दत्तच्या बायोपिकची वाट बघतो आहे. यात तो संजय दत्तची भूमिका साकारतो आहे.  संजय दत्तच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे यात उलगडण्यात येणार आहेत. रणबीरसह यात मनीष कोईराला, सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या भूमिका आहेत.आधी हा चित्रपट  ख्रिसमसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र त्याचवेळेस सलमान खान आणि कॅटरिना कैफचा टायगर जिंदा है रिलीज होत असल्याने राजकुमार हिराणीने संजय दत्तच्या बायोपिकची रिलीज डेट पुढे ढकलली. आता हा चित्रपट मार्च 2018मध्ये रिलीज होणार आहे.  
Web Title: Ranbir Kapoor and Alia Bhatt's name changed for Ranbir Kapoor?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.