खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...! हातात हात घालून दिसले रणबीर कपूर-आलिया भट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 10:27 AM2019-03-20T10:27:04+5:302019-03-20T10:31:52+5:30

बॉलिवूडचे ‘लव्ह बर्ड्स’ रणबीर कपूर व आलिया भट यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही आणि कदाचित यापुढे दोघेही ते लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. काल रात्री जे काही दिसले त्यावरून तरी हेच म्हणता येईल.

ranbir kapoor and alia bhatt at zee cine awards 2019 hand in hand | खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...! हातात हात घालून दिसले रणबीर कपूर-आलिया भट!

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...! हातात हात घालून दिसले रणबीर कपूर-आलिया भट!

ठळक मुद्दे आलिया व रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याचे खुद्द आलियाचे डॅडी महेश भट यांनीही मान्य केले आहे. आलिया व रणबीर लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहे.

बॉलिवूडचे ‘लव्ह बर्ड्स’ रणबीर कपूरआलिया भट यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही आणि कदाचित यापुढे दोघेही ते लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. काल रात्री जे काही दिसले त्यावरून तरी हेच म्हणता येईल. होय, काल झी सिने अवार्ड शोमध्ये रणबीर व आलिया दोघांनीही हजेरी लावली. शोमध्ये दोघांनीही धम्माल मस्ती केली आणि शो संपल्यानंतर हे कपल अगदी हातात हात घालून ‘खुल्लम खुल्ला’ बाहेर पडताना दिसले.

शो संपल्यानंतर रणबीर व आलिया दोघेही एकाच वेळी बाहेर पडले. यावेळी रणबीरने आलियाचा हात घट्ट पकडला होता. मीडियाच्या नजरा आपल्याकडे आहेत, हे दोघांनाही ठाऊक होते. पण त्यांना त्याची जराही पर्वा नव्हती. दोघेही गर्दीतून एकमेकांच्या हातात हात घालून गर्दीतून वाट काढताना दिसले आणि एकाच गाडीतून रवाना झालेत. तूर्तास दोघांचेही हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.. गेल्या काही दिवसांत रणबीर व आलिया दोघांच्याही कुटुंबात कमालीची जवळीक पाहायला मिळतेय.

आलिया व रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याचे खुद्द आलियाचे डॅडी महेश भट यांनीही मान्य केले आहे. आलिया व रणबीर लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहे. अमेरिकेत उपचार घेत असलेले रणबीरचे डॅड ऋषी कपूर यांना रणबीर व आलियाच्या लग्नाची घाई झाली आहे. लेकाचे लवकरात लवकर दोनाचे चार हात व्हावे, याबद्दल ते आग्रही आहेत. ऋषी कपूर येत्या काही दिवसांत भारतात परतणार आहेत. मुंबईत आल्यानंतर ऋषी कपूर सर्वप्रथम आलियाच्या कुटुंबाला भेटून लग्नाची बोलणी करतील. यानंतर शुभमुहूतार्साठी भटजींना भेटण्याचीही त्यांची योजना आहे. भटजींना भेटण्यासाठी एप्रिलमधील एक तारीख निश्चित करण्यात आली आहे. अर्थात या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Web Title: ranbir kapoor and alia bhatt at zee cine awards 2019 hand in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.