Ranbir Kapoor also walked with Aamir Khan on the foot of Alia Bhatt. | आलिया भट्टच्या पावलावर पाऊल ठेवत रणबीर कपूरनेही आमीर खानसोबत केले श्रमदान!

अभिनेता संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिकमुळे प्रचंड चर्चेत असलेला रॉकस्टार रणबीर कपूर सध्या त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘संजू’मध्ये तो संजय दत्तला हुबेहूब साकारताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामध्ये रणबीरची झलक आश्चर्यचकीत करणारी आहे. असो, रणबीरने त्याच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून बॉलिवूडचा परफेक्टनिस्ट आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्यासोबत श्रमदान केले. १ मे म्हणजेच कामगार दिनानिमित्त अभिनेत्री आलिया भट्टनेदेखील आमीरसोबत श्रमदान केले होते. आता आलियाच्या पावलावर पाऊल टाकत रणबीरने श्रमदान करून आमीरच्या कार्याला हातभार लावला. 
 

दरम्यान, या कॅम्पेनची सुरुवात आमीरच्या पानी फाउंडेशनअंतर्गत करण्यात आली असून, राज्यातील दुष्काळी भाग सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी सध्या या स्टार मंडळींकडून प्रयत्न केले जात आहेत. आमीरचे हे कॅम्पेन सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून, त्यास बॉलिवूडमधील अन्य कलाकारांचेही योगदान लाभताना दिसत आहे. आतापर्यंत बºयाचसे कलाकार आमीरसोबत श्रमदान करताना बघावयास मिळाले. आता त्यात रणबीर कपूरचेही नाव जोडले गेले. दरम्यान, श्रमदान करतानाचा रणबीर आणि आमिरचे काही व्हिडीओज् सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यास लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
 

रणबीरच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, लवकरच तो आलियासोबत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. दरम्यान, सध्या तो ‘संजू’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, त्यासाठी जागोजागी फिरताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. 
Web Title: Ranbir Kapoor also walked with Aamir Khan on the foot of Alia Bhatt.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.